फोन नंबर बंद करण्याची धमकी देणारे कॉल, सरकारने म्हटले…

Fake Call: डीओटीकडून कॉल करुन तुमच्या क्रमांकावरुन बेकायदेशीर कृत्य होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तुमचा नंबर बंद करण्यात येईल, असे कॉल टेलीकॉम डिपार्टमेंटच्या नावावरुन लोकांना येत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने दिशानिर्देश जारी केले आहे.

फोन नंबर बंद करण्याची धमकी देणारे कॉल, सरकारने म्हटले...
fale call
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 2:51 PM

मोबाईल क्रमांकावर वेगवेगळ्या प्रकारचे फेक आणि मार्केटींग कंपन्यांचे कॉल येत असतात. अनेक कॉलच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून लोकांना वेगवेगळे कॉल येत आहेत. तुमचा मोबाईल क्रमांक बंद होईल, असे हे कॉल येत आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या नावाने हे कॉल येत आहेत. यासंदर्भात डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन (DoT) कडून माहिती देण्यात आली आहे. DoT कडून कोणत्याही व्यक्तीला असे कॉल केले जात नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारकडून दिशानिर्देश

डीओटीकडून कॉल करुन तुमच्या क्रमांकावरुन बेकायदेशीर कृत्य होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तुमचा नंबर बंद करण्यात येईल, असे कॉल टेलीकॉम डिपार्टमेंटच्या नावावरुन लोकांना येत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने दिशानिर्देश जारी करुन म्हटले गेले आहे की, सरकारकडून असे कोणतेही कॉल केले जात नाही. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर असे कोणतेही मेसेज पाठवले जात नाही.

हे सुद्धा वाचा

अशी होते फसवणूक

कॉल करणारा व्यक्ती लोकांकडून त्याची वैयक्तीक माहिती मागत आहे. त्यानंतर लोकांची फसवणूक होत आहे. पाकिस्तानतील क्रमांक (उदाहरण- +92) असे व्हॉट्सअ‍ॅप कॉल येत आहेत. परंतु सरकारकडून असे कोणतेही कॉल केले जात नाही. तुमची फसवणूक झाली असल्यास 1930 क्रमांकावर कॉल करुन किंवा www.cybercryme.gov.in तक्रार दाखल करा.

ही काळजी घ्या

  • एटीएम क्रमांक किंवा चार-अंकी पिन यासारखी माहिती कोणाशीही शेअर करू नका.
  • बँक तुमच्याकडून अशा प्रकारची माहिती कधीच विचारत नाही. काही शंका असल्यास बँकेशी संपर्क साधा.
  • तुमची वैयक्तिक माहिती किंवा तुमचा नंबर सोशल मीडियावर शेअर करू नका.
  • काही महिन्यांनी तुमचे एटीएम किंवा जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम पासवर्ड बदलत राहा.
  • जर तुम्हाला कोणी पैसे पाठवत असेल तर त्यासाठी तुमच्या नंबरवर पिन येत नाही, त्याला काही शेअर करू नका. ही फसवणूक आहे.
  • कोणतेही ॲप इंस्टॉल केल्यानंतर काही परवानगी मागतो. जसे लोकेशन, कॅमेरा, फोटो आणि व्हिडिओ. लोक न पाहता घाई करतात आणि ठीक करतात. हे करणे टाळा. कोणत्याही ॲपची मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा.
Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.