घरभाड्याच्या बनावट पावत्या देणारे आयकर विभागाच्या रडारवर, हजारो प्रकरणे उघड

HRA Fraud: पॅन क्रमांक, नवीन तंत्रज्ञान आणि डाटा अ‍ॅनालिसिस करुन बनावट पावत्या देणाऱ्यांचा शोध आयकर विभाग घेत आहे. बनावट पावत्या देणारे लोकांना दंड, व्याज द्यावाच लागणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात खटलाही चालवला जाऊ शकतो.

घरभाड्याच्या बनावट पावत्या देणारे आयकर विभागाच्या रडारवर, हजारो प्रकरणे उघड
hra
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 1:37 PM

आयकर वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयोग लोकांकडून केले जातात. अनेक जण घरभाड्याच्या बनावट पावत्या देतात. परंतु घरभाड्याच्या बनावट पावत्या देणारे लोक आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. आयकर विभागाने बनावट पावत्या देणारे 8000 ते 10000 हजार प्रकरणे शोधून काढले आहेत. या प्रकरणातून कोट्यवधी रुपयांचा कर वाचवून आयकर विभागाला चुना लावल्याचे प्रकार समोर आले आहे. आता ही सर्व लोक आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणात पूर्ण जबाबदारी एचआरएच्या बनावट पावत्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांची असणार आहे. कंपनीची जबाबदारी नसणार आहे.

कसा उघड झाला प्रकार

आयकर विभागाने हे सर्व प्रकार पॅन नंबरवरुन शोधून काढले आहेत. एका व्यक्तीने एक कोटी रुपये भाडे देत असल्याची पावती जोडली. मग त्या पॅन क्रमांकावर शोध घेतला असता मालकाकडे इतकी रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या मालकाला चौकशीसाठी बोलवल्यावर इतकी रक्कम भाडे मिळत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. या पद्धतीने बनावट घरभाडे पावत्या उघड झाल्या. चौकशीतून पगारदार व्यक्ती कर बचतीचा फायदा घेण्यासाठी बनावट पावत्या देत असल्याचे लक्षात आले. सर्व प्रकरणांची चौकशी केली असता अशी आठ ते दहा हजार प्रकरणे समोर आली आहेत.

दंड अन् खटला चालू शकतो

बनावट घरभाडे पावत्या दिल्यानंतर आयकर विभाग काय कारवाई करते? यासंदर्भात बोलताना चार्टेड अकाउंटेंट आशीष म‍िश्रा म्हणतात, पॅन क्रमांक, नवीन तंत्रज्ञान आणि डाटा अ‍ॅनालिसिस करुन बनावट पावत्या देणाऱ्यांचा शोध आयकर विभाग घेत आहे. बनावट पावत्या देणारे लोकांना दंड, व्याज द्यावाच लागणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात खटलाही चालवला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

आई-वडिलांना घरभाडे देत असाल तर…

तुम्ही जर घर भाडे आई-वडिलांना देत असाल तर ते ही प्रामाणित पद्धतीने केले पाहिजे. धनादेश (चेक) किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर प्रणाली वापरली पाहिजे. रोकड दाखवलेली रक्कम ग्राह्य धरली जात नाही. तसेच आई-वडिलांनी मुलाकडून मिळत असलेले ते भाडे आपल्या आयकर रिर्टनमध्ये दाखवले पाहिजे.

हे ही वाचा

कर बचतीसाठी दोन दिवस, जेरोधाच्या नितिन कामथ यांनी सांगितली आयडिया

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.