वाढदिवसाला ऑनलाईन केक मागवला, केक खाल्यानंतर हसत्या, खेळत्या मुलीचा मृत्यू, अजोबांनी व्हिडिओतून सांगितले…

birthday girl death news: केक खाल्यानंतर सर्वांना त्रास सुरु झाला. या घटनेत नातीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोग्य विभागाने काहीच कारवाई केली नाही. यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हरबंस यांनी केली आहे.

वाढदिवसाला ऑनलाईन केक मागवला, केक खाल्यानंतर हसत्या, खेळत्या मुलीचा मृत्यू, अजोबांनी व्हिडिओतून सांगितले...
केक खाल्यामुळे दहा वर्षीय मानवीचा मृत्यू झाला.
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 8:32 AM

सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. भाजीपाल्यापासून खाद्यपदार्थापर्यंत सर्व काही फोनवर बुक करुन घरी मागवले जाते. पंजाबमधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबाने दहा वर्षीय मुलीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑनलाईन केकची ऑर्डर दिली. परंतु केक खाल्यानंतर कुटुंबातील सर्वांना त्रास होऊ लागला. कुटुंबातील सदस्यांना उलट्या सुरु झाल्या. ‘बर्थ डे गर्ल’ असलेली दहा वर्षीय मानवी हिलाही उलट्या सुरु झाल्या. तिचे शरीर थंड पडले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. मानवी बाबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ तिच्या आजोबांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कशी घडली घटना

पंजाबमधील पटियाला येथील अमन नगर येथे राहणारे काजल यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी म्हटले की, २४ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता ऑनलाईन केक मागवला. ६.३० वाजता केक घरी आला. केक खाल्यानंतर मानवीसह परिवारातील अन्य कुटुंबाची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. मानवी आणि तिच्या लहान बहिणीला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचार सुरु असताना मानवीचा मृत्यू झाला. तिच्या लहान बहिणेचे प्राण वाचले. कुटुंबातील चार सदस्यांची प्रकृती बिघडली होती.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हिडिओ

अजोबा हरबंस यांनी सोशल मीडियावर घटनेची माहिती दिली. मानवी पाचवीत शिक्षण घेत होती. ती वर्गात मॉनिटर होती. झोमॅटोवरुन केक मागवला होता. त्यानंतर केक खाल्यानंतर सर्वांना त्रास सुरु झाला. या घटनेत नातीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोग्य विभागाने काहीच कारवाई केली नाही.

यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हरबंस यांनी केली आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी सुरिंदर सिंग यांनी म्हटले की, घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. केक आलेल्या ठिकाणावर जाऊन तपास करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.