Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरात पुन्हा कोयता वार, भरदिवसा नातेवाईकांमध्येच थरार, दोन गंभीर जखमी

Pune Crime News: पुणे शहरात कोयता वार, कोयता हल्ला या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यामुळे पुणे पोलिसांनी कोयता गँग संपवण्याचा निर्धार व्यक्त करत कारवाई सुरु केली. कोयत्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्यांची धिंड काढली. त्यानंतर कोयता विक्री करणाऱ्यांना नियमावली तयार करुन दिली.

पुणे शहरात पुन्हा कोयता वार, भरदिवसा नातेवाईकांमध्येच थरार, दोन गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 1:39 PM

पुणे शहरात पुन्हा कोयताने वार झाले आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकमेकांवर कोयत्याने वार झाले. विशेष म्हणजे वार करणारे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. पुणे शहरात भर दिवसा झालेल्या या थरारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे. पुणे शहरात कोयता गँग सक्रीय आहे. या कोतत्या गँगवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात असताना अधूनमधून कोयत्याने वारच्या घटना समोर येत आहेत.

काय घडला प्रकार

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे येथील शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे असे दोघे नातेवाईक आहेत. त्यांनी एकमेकांवर वार केले. हा सगळा प्रकार पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून घडला.

मिरेकर याचा धोत्रे यावर राग होता. तसेच त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने धोत्रे याला होता. यामुळे त्याने मिरेकर याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर धोत्रे याने सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलवून मिरेकर याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही जण जखमी झाले. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

कोयता विक्रीसाठी निर्बंध

पुणे शहरात कोयता वार, कोयता हल्ला या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यामुळे पुणे पोलिसांनी कोयता गँग संपवण्याचा निर्धार व्यक्त करत कारवाई सुरु केली. कोयत्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्यांची धिंड काढली. त्यानंतर कोयता विक्री करणाऱ्यांना नियमावली तयार करुन दिली. आधार कार्ड घेतल्याशिवाय कोयत्याची विक्री करु नये, असे पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर पुण्यातील कोयता हल्लाचा घटना कमी होत नाही.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.