उमेदवारी अर्जासोबत चिल्लरचा ढिग, वेळ संपला तरी अधिकारी मोजण्यात दंग

कोल्हापूर: गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मकरंद अनासपुरेच्या सिनेमातील प्रसंग सध्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक उमेदवार अनामत रक्कम म्हणून चिल्लर घेऊन जात आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर राजाराम पन्हाळकर यांनी अनामत रक्कम म्हणून सुमारे साडेसतरा हजारांची नाणी भरली. …

उमेदवारी अर्जासोबत चिल्लरचा ढिग, वेळ संपला तरी अधिकारी मोजण्यात दंग

कोल्हापूर: गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मकरंद अनासपुरेच्या सिनेमातील प्रसंग सध्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक उमेदवार अनामत रक्कम म्हणून चिल्लर घेऊन जात आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर राजाराम पन्हाळकर यांनी अनामत रक्कम म्हणून सुमारे साडेसतरा हजारांची नाणी भरली. त्यामुळे ही चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. पन्हाळकर यांनी काही नोटा आणि बाकीची चिल्लर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. अर्ज भरण्यास पंधरा मिनिटांचा वेळ शिल्लक होता, त्याचवेळी पन्हाळकर यांनी कार्यालयांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही चिल्लर मोजण्यासाठी सुमारे दीड तासांचा कालावधी लागला. दुपारी तीननंतर बंद होणारी प्रक्रिया काल मात्र पाच वाजेपर्यंत सुरू होती.

किशोर पन्हाळकर हे दिव्यांग आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या मित्रांनी काही रक्कम जमा केली. यामध्ये एक रुपये, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. तर काही नोटादेखील पन्हाळकर यांनी भरल्या आहेत. दीड तास अनामत रकमेची मोजणी सुरू होती. त्यानंतरच पन्हाळकर यांना अनामत रकमेची पावती देण्यात आली. मात्र याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर झाली.

मकरंद अनासपुरेच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमातही असाच प्रसंग दाखवण्यात आला होता. तेव्हापासून निवडणुकांमध्ये अनामत रक्कम म्हणून चिल्लर भरण्याचं प्रमाण वाढलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *