डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पेठवडगांव पोलिसांनी आरोपी पती आदम पठाण (वय 37) याला अटक केली आहे. आदम पठाण आणि त्याची पत्नी बिसमिल्ला (वय 37) या दोघांमध्ये गुरुवारी वाठार पेठवडगांव रोडवरील सिंमेंट …

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पेठवडगांव पोलिसांनी आरोपी पती आदम पठाण (वय 37) याला अटक केली आहे.

आदम पठाण आणि त्याची पत्नी बिसमिल्ला (वय 37) या दोघांमध्ये गुरुवारी वाठार पेठवडगांव रोडवरील सिंमेंट कारखान्याजवळ वाद झाला. संशय आणि आर्थिक व्यवहारावरुन आदम याचा बिसमिल्लासोबत वाद झाला. या वादात आदमने रागाच्या भरात बिसमिल्लावर दगडाने प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आदम स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.

आदम आणि बिसमिल्ला  यांचा विवाह 20 वर्षापुर्वी झाला होता. हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथे आदम गौस पठाण आणि पत्नी बिसमिल्ला आपल्या दोन मुलं आणि आई-वडीलांसह राहत होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *