मला आत्महत्या करावीशी वाटतेय, महिलेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

नावीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती : आपल्याला आत्महत्या करावीशी वाटत असल्याची पोस्ट हर्षदा झगडे या महिलेने फेसबुकवर टाकली. हर्षदाच्या या पोस्टवर तिला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. ज्यानंतर एका पत्रकाराने या घटनेची माहिती बारामती पोलिसांपर्यंत पोहोचवली आणि पोलिसांनी शोध घेऊन या महिलेला जीवनदान दिले. काय आहे संपूर्ण प्रकरण ? हर्षदा झगडे या मूळच्या …

मला आत्महत्या करावीशी वाटतेय, महिलेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

नावीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती : आपल्याला आत्महत्या करावीशी वाटत असल्याची पोस्ट हर्षदा झगडे या महिलेने फेसबुकवर टाकली. हर्षदाच्या या पोस्टवर तिला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. ज्यानंतर एका पत्रकाराने या घटनेची माहिती बारामती पोलिसांपर्यंत पोहोचवली आणि पोलिसांनी शोध घेऊन या महिलेला जीवनदान दिले.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

हर्षदा झगडे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आहे. लग्नानंतर त्या सासरी बारामतीत आल्या. लग्नाच्या सहा महिन्यातच त्यांचे सासरच्यांशी खटके उडू लागले. हे प्रकरण घटास्फोटापर्यंत पोहोचलं आणि आता हा खटला न्यायालयात सुरु आहे. 2006 साली हर्षदा यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च आला. त्यांनी चरितार्थासाठी भाडोत्री जागेत खानावळीचा व्यवसाय सुरु केला. मात्र, डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर घेतलेल्या औषधांचा त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. ज्याचा परिणाम हाडांवर होऊन त्यांच्या शारीरिक व्याधी वाढू लागल्या.

माहेरच्यांसह सासरच्यांनी दुर्लक्ष केले. त्यातच अजारपण बळावले. याच आजारपणासाठी एका खाजगी सावकाराकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले. त्याच्या तीन पट रक्कम परत देऊनही तो सावकार आणखी पैशांची मागणी करत होता. सावकाराचा नेहमीचा त्रास आणि वाढत चाललेलं आजारपण यासर्वांना कंटाळून आत्महत्या करावीशी वाटत असल्याची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली.

हर्षदा यांना लिखाणाची आवड असल्याने त्या नेहमीच वेगवेगळ्या विषयावर फेसबुकवर लिहत असतात. त्यामुळे फेसबुकवर त्याचे मोठे फ्रेंड सर्कल आहे. त्यांच्या या अचानक पडलेल्या आत्महतेच्या पोस्टमुळे या चाहत्यांनी काही क्षणात कमेंट्स करत त्यांना आत्महतेपासून परावृत्त करण्याचे प्रयात्न केले. यात एका जागृत पत्रकाराने पोलिसांना याचा माहिती दिली. पोलिसांनी संभाव्य धोका ओळखून हर्षदाचा शोध घेत तिचे घर गाठले. त्यांना जगण्याची नवी उमेद देली.

एवढचं नाही तर हर्षदा यांनी त्रास देणाऱ्या सावकारावर कायदेशीर कारवाई करत त्याला अटक केली.

गुन्हा घडल्यानंतर पोलिस उशिरा त्या ठिकाणी पोहचतात अशी टीका नेहमीच होत असते. पण बारामतीतील पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा जीव वाचला आणि तिला जगण्याची नवी उमेद मिळाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *