शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी IAS अधिकारी बनले वारकरी! टाळ आणि मृदंगाच्या साथीनं कीर्तनातून प्रसार

| Updated on: Jan 31, 2021 | 8:28 PM

त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नये, असे आवाहन फड यांनी केले. (IAS Dr. Vijaykumar Phad creating awareness)

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी IAS अधिकारी बनले वारकरी! टाळ आणि मृदंगाच्या साथीनं कीर्तनातून प्रसार
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड हे आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. पण आज त्यांचे वारकरी रूप उस्मानाबादकरांना पाहायला मिळाले. फड यांनी पदाचा अहंकार न ठेवता कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत विविध शासकीय योजना पोहोचवण्यास सुरुवात केली. (IAS Dr. Vijaykumar Phad creating awareness about government schemes through kirtan)

“अधिकारी असलो तरी पहिले लोकसेवक आहोत आणि लोकांची सेवा करण्यासाठीच नेमणूक झाली आहे. त्यामुळे लोकसेवा हा हेतू लक्षात ठेवत काम करणे गरजेचे आहे,” असे मत फड यांनी मांडले. यावेळी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, उस्मानाबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते.

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने उस्मानाबाद येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी प्रवचन करताना फड यांनी वारकरी वेशभूषा जनजागृती केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांसह सर्व घटकांच्या आर्थिक उन्नती आणि कल्याणासाठी अनेक शासकीय योजना सुरु केल्या आहेत. मात्र त्यांचा लाभ अनेक जण घेत नाहीत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. यात योजनेचे स्वरूप, लाभार्थी पात्रता, अटी यांची माहिती दिली जाणार आहे.

सरकारने अनेक योजना दिल्या असल्या तरी आत्महत्या होतात. ठिबक, शेततळी, शौचालय, पीककर्ज यांसह अनेक योजना आहेत. मात्र त्याचा लाभ योग्य लाभार्थीना मिळत नाही. बैलगाडी, जनावरे खरेदीसाठी शासन कर्ज अनुदान देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नये, असे आवाहन फड यांनी केले. (IAS Dr. Vijaykumar Phad creating awareness about government schemes through kirtan)

महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठा आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून योजनांची माहिती म्हणजे समाज गाथा आहे असे समजून लोकांपर्यंत पोहचवली पहिजे. ज्या गावात वृक्षारोपण केले जाईल किंवा शौचालयाचा 100 टक्के वापर केला जाईल. त्याच गावात कीर्तन कार्यक्रमाला जावे अशी अट गावकऱ्यांना केल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल असे फड म्हणाले.

या कीर्तनाच्या माध्यमातून एका शेतकऱ्याची आत्महत्या जनजागृतीने रोखता आली तरी त्याचे पुण्य वारकरी संप्रदायाला मिळेल. त्यामुळे वारकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन फड यांनी केले.  वारकरी कोणत्याही संकटावर मात करतात व त्यांच्या शब्दाला महत्व असल्याने वारकऱ्यांनी कीर्तन आणि प्रवचनातून जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

वारकरी झाल्यानंतर आणि पायी दिंडी केल्यानंतर मीपणा, अहंकार जातो, असे सांगत उस्मानाबाद शहरात भव्य असे वारकरी भवन उभे करण्यासाठी नगर परिषदेची जागा आणि 10 लाखांचा निधी देण्याची घोषणा नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी केली.  (IAS Dr. Vijaykumar Phad creating awareness about government schemes through kirtan)

संबंधित बातम्या : 

‘मंत्रिपद गेल्यानंतर बावनकुळेंचा अभ्यास कच्चा झाला’, विनायक राऊतांचा टोला

‘तुला अक्कल नाही का?’ म्हणताच पोलिसांवर जीवघेणा हल्ला; पुणे हादरले