‘तुला अक्कल नाही का?’ म्हणताच पोलिसांवर जीवघेणा हल्ला; पुणे हादरले

पुण्याच्या चाकणमध्ये भर चौकात वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. (Pune Attack on Traffic Police)

  • Updated On - 12:21 am, Mon, 1 February 21 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
'तुला अक्कल नाही का?' म्हणताच पोलिसांवर जीवघेणा हल्ला; पुणे हादरले
पुणे पोलीस हल्ला

पुणे : राज्यात पोलिसांवरील हल्ले थांबायचं नाव घेत नाही. नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांचा मृत्यू झाला. तर आता पुण्याच्या चाकणमध्ये भर चौकात वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. कंटेनर मागे घेण्याच्या वादातून हा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितलं जात आहे. सुदैवाने ते यातून बचावले आहेत. रवींद्र नामदेव करवंदे (30) असे या जखमी पोलिसाचे नाव आहे. (Pune Attack on Traffic Police)

चाकण वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी रवींद्र नामदेव करवंदे हे तळेगाव चाकण चौकात शनिवारी दुपारी कर्तव्य बजावत होते. त्यावेळी नाशिकच्या बाजूने येणारा एक कंटेनर सिग्नल मोडून पुढे आला. त्यावेळी रवींद्र करवंदे यांनी त्या कंटेनर चालकाला तो कंटनेर वाहतूक सिग्नलच्या मागे घेण्यासाठी सांगितले. त्यावेळी त्या पोलिसांनी ‘तुला अक्कल नाही का?’ असं म्हणत आरोपींवर ओरडले. यावरून वाहतूक पोलीस करवंदे आणि आरोपीमध्ये शाब्दिक वाद झाला होता.

त्यानंतर मात्र कंटेनर चालक हर्षदीप कांबळे आणि रोहित साळवी या दोघांनी वाहतूक पोलीस करवंदे यांचा राग मनात धरला. यानंतर दोन तासाने या आरोपींनी आपला कंटेनर चाकणजवळील खराबवाडी याठिकाणी पार्क केला. त्यानंतर दुचाकी घेऊन पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांच्याकडे आले. भरचौकामध्ये वाहतूक कर्तव्य बजावत असताना पाठीमागून अचानक त्या आरोपींनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला.

हा हल्ला इतका जबरदस्त होता की, करवंदे हे रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. करवंदे यांच्यावर सध्या जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आरोपींना अटक 

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने दुचाकीवरुन आलेल्या दोघांची ओळख पटवली. त्यानंतर आरोपी हे मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्नात होते. मात्र त्यावेळी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने चाकणच्या खराबवाडी येथून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मुख्य शहरात वाहतूक पोलिसांवरील हल्ले वाढल्याचे अधोरेखित झालं आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना बेसावध राहून चालणार नाही.  (Pune Attack on Traffic Police)

संबंधित बातम्या : 

मग तुम्ही म्हणाल, हा बाबासारखाच चिडतो; अजितदादांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Corona vaccine | कोरोनाला थोपवण्यासाठी सीरमची आणखी एक लस, जूनमध्ये लॉन्च होण्याची शक्यता

संबंधित व्हिडीओ :


Published On - 5:49 pm, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI