
गुजरातमध्ये महापालिका निवडणुका तोंडावर असताना काही मोठे बदल करण्यात आलीत. गुजरातच्या महापालिका निवडणुकीकडे देशाच्या नजरा आहेत. गुजरातमध्ये एकहाती सत्ता भाजपाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे असून महापालिका निवडणुकीत जनता नक्की कोणाच्या पाठीशी उभी राहते, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच भारतीय निवडणूक आयोगाने गुजरात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त अर्थात सीईओ पदावर नवीन नियुक्ती केली असून चक्क एका मराठी माणसाच्या हाती ही धुरा सोपवली. आयोगाने गुजरात केडरचे 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संदीप सांगळे यांची नियुती सीईओ म्हणून केली आहे. संदीप सांगळे हे मुळ महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते गुजरातमधील विविध शहरांमध्ये सेवा बजावत आहेत. आता त्यांच्यावर अत्यंत मोठा जबाबदारी टाकण्यात आली.
2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संदीप सांगळे यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ असून ते दिलेली जबाबदारी अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिक पणे निभावतात, अशी त्यांची ओळख आहे. अहमदाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले. भरूच आणि बनासकांठा या जिल्ह्यांमध्येही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले. एक वेगळी त्यांच्या कामाची छाप यादरम्यान त्यांची बघायला मिळाली.
मुख्य निवडणूक अधिकारीपदाची जबाबदार आयएएस अधिकारी हरित शुक्ला यांच्याकडे होती. शुक्ला हे 1999 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आता त्यांच्या जागी संदीप सांगळे यांची वर्णी लागली. सांगळे आतापर्यंत गुजरात क्रीडा प्राधिकरणाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. आता राज्य निवडणूक अधिकारीपदी त्यांची वर्णी लागली.
विशेष म्हणजे सांगळे यांची नियुक्ती अशावेळी करण्यात आली, ज्यावेळी गुजरात महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. गुजरात निवडणूक आयोगाचे नवे सीईओ संदीप सागळे यांच्याकडे आता राज्यातील प्रमुख शहरांमध्ये निवडणुका घेण्याची जबाबदारी असेल. यासोबतच या निवडणुका व्यवस्थित पार पाडणे हे देखील मोठे आव्हान त्यांच्यापुढे नक्कीच आहे. अकोल्यामध्येच संदीप सांगळे यांचे शिक्षण झाले, त्यानंतर 2007 मध्ये त्यांची आयएएस म्हणून निवड झाली.