AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS जोडप्याच्या लग्नाची गोष्ट ! ना बँड-बाजा ना वरात, मिनी सचिवालयात झाले शुभमंगल

लग्न म्हटले की लोक कर्ज काढून थाटामाटात विवाह करतात. मात्र, एका आयएएस जोडप्याने अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करुन लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

IAS जोडप्याच्या लग्नाची गोष्ट ! ना बँड-बाजा ना वरात, मिनी सचिवालयात झाले शुभमंगल
IAS wedding
| Updated on: Feb 20, 2026 | 12:24 PM
Share

साल २०२३ बॅचचे IAS अधिकारी माधव भारद्वाज आणि अदिती वासने यांनी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील मिनी सचिवालयात लग्न केले आहे. या दरम्यान कोणताही बँडबाजा नव्हता की वरात निघाली नाही.अत्यंत साधेपणाने जिल्हा कलेक्टर अर्पिता शुक्ला यांच्या समोर दोघांनी त्यांचा विवाह रजिस्टर केला. यावेळी दोघांचे आई-वडील आणि भावंडे उपस्थित होते. माधव भारद्वाज अलवर येथे SDM पदावर कार्यरत आहेत. तर अदिती वासने गुजरातच्या जामनगरातील SDM आहेत.

देशभरात लग्न समारंभावर लाखो रुपयांची उधळपट्टी करीत श्रीमंतीचा देखावा केला जातो. परंतू अलवर येथील मिनी सचिवालयात दोघा आएएस अधिकाऱ्याचा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तराखंड मसूरीतील निवासी राजकुमार भारद्वाज यांचे पुत्र माधव भारद्वाज अलवर येथे एसडीएम पदावर तैनात आहेत. त्यांची पत्नी अदिती वासने मुळची युपीच्या बरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. अदिती वासने हीचे वडील व्यापारी आहेत. अदितीला तीन भाऊ-बहिण आहेत.

कलेक्टर ऑफीसात रजिस्टर्ड लग्न

दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने जिल्हा कलेक्टर अर्पिता शुक्ला यांच्या समोर १८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या विवाहाची नोंदणी केली. यावेळी त्यांचे मोजके कुटुंबिय हजर होते. आयएएस माधव आणि अदिती यांनी सांगितले की दोघांची भेट ट्रेनिंग दरम्यान झाली होती. नंतर त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या परवानगीने बुधवारी अलवर जिल्हा कलेक्टर अर्पिता शुक्ला समोर त्यांच्या विवाहाची नोंदणी केली. त्यावेळी मिनी सचिवालयाचे अधिकारी उपस्थित होते. या लग्नाचे लग्नाचे खुब चर्चा होत आहे

प्रशासनात या लग्नाची खुप चर्चा होत आहे. समाजात इतक्या मोठ्या पदावर असलेल्या या जोडप्याने सिद्ध केले आहे की परंपरा आणि नात्यांसाठी देखावा उपयोगी नाही. केवळ मने एकत्र येणे गरजेचे आहे. साध्यापणाने विवाह केल्याने हेच पैसे पुढे भविष्यात कामी येऊ शकतात. सोशल मीडियावर या साध्या आयएएस जोडप्याच्या लग्नाची चर्चा होत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...