AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं

Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं

| Updated on: Oct 07, 2026 | 6:16 PM
Share

दिल्लीत काँग्रेस खासदारांना निवडणूक आयुक्तांना भेटण्यापासून रोखण्यात आले. या निषेधार्थ प्रियंका गांधी आणि अन्य महिला खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत, त्या रस्त्यावर झोपून निषेध करत होत्या. राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते.

दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि इतर खासदारांना निवडणूक आयुक्तांना भेटण्यापासून रोखण्यात आल्यानंतर, त्यांनी रस्त्यावरच तीव्र आंदोलन केले. पोलिसांकडून पुढे जाऊ न दिल्याने संतप्त झालेल्या प्रियंका गांधी आणि काही महिला खासदार थेट रस्त्यावर झोपून निषेध व्यक्त करत होत्या.

यावेळी प्रियंका गांधींनी आरोप केला की, “आम्हाला मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटायचे होते, पण आम्हाला मारहाण करण्यात आली आणि खाली ढकलण्यात आले. खासदारांसोबत असे गैरवर्तन करणे ही कोणती पद्धत आहे?” पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा करत त्यांनी म्हटले की, त्यांच्या शरीरावर ओरखडे आले आहेत.

पोलिसांनी राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते. मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, मोदी तेरी गुंडागर्दी नही चलेगी आणि दिल्ली पुलिस तेरी गुंडागर्दी नही चलेगी अशा घोषणा देत त्यांनी सरकार आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. प्रियंका गांधींनी स्पष्ट केले की, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्या आणि त्यांचे सहकारी तिथून हटणार नाहीत. हे आंदोलन ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात असल्याचेही सांगण्यात आले.

 

 

Published on: Oct 07, 2026 06:16 PM

Follow Us