AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हळदीच्या समारंभात रक्ताचा सडा, दोन गटात तुफान हाणामारी, तिघांचे प्राण गेले

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे हळदीच्या समारंभात दोन गटात प्रचंड हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात चाकूने भोसकाभोसकी झाल्याने तिघांचा बळी केला आहे.

हळदीच्या समारंभात रक्ताचा सडा, दोन गटात तुफान हाणामारी, तिघांचे प्राण गेले
dhule crime news
| Updated on: Feb 20, 2026 | 12:24 PM
Share

अवघ्या उद्यावर आलेल्या विवाहाची धामधुम सुरु असताना हळदीच्या कार्यक्रमात वराकडील मंडळी हास्यविनोदात मग्न असतानाच अचानक या लग्नसमारंभावर अवकळा पसरली. कारण हळदीच्या समारंभातच रक्ताचे पाट वाहिल्याची घटना घडली आहे.  दोन गटात बाचाबाची होऊन चाकुने एकमेकांवर वार झाले आणि या हाणामारीत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जखमीचा धुळ्यातील रुग्णालयात मृत्यू झाल्याने लग्नाच्या मंडपात मातम पसरल्याची घटना घडली आहे.

धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपरळनेर येथे एका विवाहाच्या समारंभाची तयारी सुरु असताना धक्कादायक घटना घडली आहे. उद्यावर आलेला विवाह आणि आज हळदीचा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक दोन गटात हाणामारी सुरु झाली. आणि त्यात तिघांना चाकूने भोसकण्यात आले. यात दोघांचा पिंपळनेर मध्ये मृत्यू झाला तर एकाचा धुळ्यातील रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

लग्न पत्रिकेत नाव न छापल्याने वाद

पिंपळनेर येथील नीळकंठ नगरात गोसावी समाजाचे लग्न कार्य सुरु होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. स्थानिक साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकात आधीपासून काही तरी वाद निर्माण झाले होते. मात्र साखरपुड्याच्या आधी काही नातेवाईकांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून डिवचल्याचे निमित्त झाले. लग्न पत्रिकेत नाव न छापल्याने वाद झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी धारदार शस्रांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र,यांच्यात नेमका वाद कसला होता. याची माहिती काही मिळालेली नाही.

एकूण आठ जण जखमी

या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, सुरेश मोजगीर गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी यांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण आठ जण जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. उपचाराचा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिस तपास सुरु असून यशवंत गोपाल गोसावी,अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभु गिरी गोसावी, हर्षु शंभु गोसावी यांच्यावर आरोप आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...