AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIR विरोधातील आंदोलनात ध्रुव राठी सहभागी होणार! पण कधी अन् कुठे? नवीन व्हिडिओत सगळंच सागितलं

Dhruv Rathee Bengaluru Protest News: सिंघमचा डायलॉग बोलत प्रकाश राजांनी ज्ञानेश कुमारांना ललकारलं आहे. बंगळुरूत ध्रुव राठी आंदोलनात सहभागी होणार आहे.

SIR विरोधातील आंदोलनात ध्रुव राठी सहभागी होणार! पण कधी अन् कुठे? नवीन व्हिडिओत सगळंच सागितलं
| Updated on: Oct 07, 2026 | 11:06 PM
Share

अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनी बंगळूरुमध्ये एसआयआरच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात अधिक लोकांनी सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यांनी बुधवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आंदोलनात एक विशेष पाहुणे उपस्थित राहणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर एका व्हिडिओमध्ये त्यांनी त्या पाहुण्याचे नाव उघड केले आहे. त्यांनी सांगितले की, ध्रुव राठी या आंदोलनात सहभागी होणार आहे. यानंतर प्रकाश राज यांनी सिंघममधील डायलॉग बोलत ज्ञानेश कुमारांना थेट आव्हान दिलं आहे.

ध्रुव राठीच्या उपस्थितीची घोषणा करताना प्रकाश राज म्हणाले, आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी एका विशेष पाहुण्याची ओळख करून देण्याचे वचन दिले होते. एक कणखर आवाज. बंगळूरमधील फ्रीडम पार्कमध्ये आमच्यासोबत सामील होणारे दुसरे कोणी नसून ध्रुव राठी आहे. ध्रुव राठी पहिल्यांदाच बंगळूरमध्ये आले आहेत. एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठीच्या या आंदोलनात ते आमच्यासोबत असतील. आली रे आली ज्ञानू आता तुझी पाळी आली, असं म्हणत प्रकाश राज यांनी कुमारांवर निशाणा साधला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhruv Rathee (@dhruvrathee)

त्यानंतर प्रकाश राज यांनी अधिक लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मोठ्या संख्येने या. तिथे उपस्थित असलेल्या ओइशीच्या पाठीशी उभे राहा. ओइशी घोष तिथे असेल, नेहा बोरा तिथे असेल. विविध युवा संघटना तिथे असतील. नागरी समाजाचे प्रतिनिधी तिथे असतील. कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यांमधून या प्रक्रियेमुळे प्रभावित झालेले लोकही तिथे असतील. चला, आपण सर्व एकत्र उभे राहूया.

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके ८ ऑक्टोबर रोजी बंगळूरमधील फ्रीडम पार्कमध्ये एका आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. हे आंदोलन सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. प्रकाश राज यांच्यासोबत विविध संघटनांचे सदस्य आणि स्थानिक रहिवासीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी एसआयआर प्रक्रियेबद्दल प्रकाश राज म्हणाले, “हा केवळ मतदानाचा प्रश्न नाही. हा लोकशाही आणि संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या.”

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...