किम जोंग उन यांचा ट्रम्प यांना मोठा धक्का, यापूर्वी अमरेकिसोबत असं कोणत्या देशाने कधीच केलं नाही, घोर अपमान
उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन हे सातत्याने आपल्या देशातील अण्वस्त्रांचा साठा वाढवतच चालले आहेत. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कोरियाने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.

उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन हे सातत्याने आपल्या देशातील अण्वस्त्रांचा साठा वाढवतच चालले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र किम जोंग उन यांनी ट्रम्प यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पहायला मिळत आहे. ट्रम्प यांना किम जोंग उन गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नरच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प प्रशासनाने अनेकवेळी उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तर कोरियाकडून अमेरिकेला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये.
या रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन वरून आणि इतर माध्यमातून किम जोंग उन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र किम जोगं उन यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांना वैयक्तिक स्थरावर एक पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्कमध्ये असलेल्या उत्तर कोरियाच्या कार्यालयाच्या माध्यमातून हे पत्र किम जोंग उन यांना पाठवण्याची योजना बनवण्यात आली होती.
ठरल्यानुसार अमेरेकी अधिकाऱ्यांचा एक समूह हे पत्र घेऊन या कार्यालयाबाहेर पोहोचला. जेव्हा उत्तर कोरियाचा एक अधिकारी त्या ठिकाणी आला तेव्हा ते पत्र त्याला देण्यात आलं, मात्र त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या एका बैठकीदरम्यान या अधिकाऱ्याने हे पत्र उघडून न पाहाताच जसच्या तसं पुन्हा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं, यावरून हे स्पष्ट होत आहे की, किम जोंग उन हे पूर्णपणे ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात किम जोंग उन आणि ट्रम्प यांच्यामध्ये तीनदा बोलणं झालं होतं. मात्र त्यावेळी अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोरणाला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आता किम जोंग उन यांनी ट्रम्प यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पहायला मिळत आहे.
