AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP : कॉकरोच जनता पार्टीची नवी इंनिंग, अभिजित दीपकेंचा मोठा निर्णय

Cockroach club pune launch : पुण्यात एका अनोख्या क्लबची सुरुवात झाली आहे. नाव आहे कॉकरोच क्लब! हा क्लब नेमका काय आहे? कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला आणि पहिल्या कार्यक्रमाला कोण उपस्थित होते?

CJP : कॉकरोच जनता पार्टीची नवी इंनिंग, अभिजित दीपकेंचा मोठा निर्णय
Cockroach club pune launch Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 8:47 PM
Share

पुण्यात सध्या एका अनोख्या क्लबची चर्चा सुरू झाली आहे. नाव आहे ‘कॉकरोच क्लब’. नाव ऐकल्यानंतर हा एखादा नाइटक्लब किंवा रेस्टॉरंट असावा, असा तुमचा समज होऊ शकतो. मात्र, हा क्लब मनोरंजनासोबतच सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील पहिल्या Gen Z आंदोलनाचे नेतृत्व केल्याचा दावा करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) या क्लबची सुरुवात केली आहे. पुण्यात 21 नोव्हेंबर 2026 रोजी या क्लबचा पहिला कार्यक्रम पार पडला. त्यामुळे आता या अनोख्या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे कॉकरोच क्लबची संकल्पना?

कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेला हा क्लब म्हणजे केवळ मनोरंजनाचे ठिकाण नाही. कॉमेडी, व्यंग आणि वैचारिक चर्चांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत सामाजिक आणि राजकीय विषय पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘लिगेसी ऑफ बापू’ ही थीम घेऊन या क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक-राजकीय मुद्दे पारंपरिक आंदोलनांऐवजी मनोरंजन आणि संवादाच्या माध्यमातून Gen Z पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यामागे आहे.

पुण्यात पहिला कार्यक्रम, तरुणांची उपस्थिती

कॉकरोच क्लबचा पहिला अधिकृत कार्यक्रम 21 नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती लावली. यावेळी स्टँडअप कॉमेडियन ‘मराठी कपिल’ यांच्यासह अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता. मात्र, उपस्थित राहण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अधिकृत पास आवश्यक होता.

अभिजीत दीपके कार्यक्रमाला गैरहजर

या कार्यक्रमाला कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह पक्षाचे अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र, पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके या कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक आणि अभिजीत दीपके यांचे निकटवर्तीय असलेल्या आशुतोष रांका यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कॉकरोच क्लबची सुरुवात झाल्याची माहिती दिली. लवकरच यासंदर्भातील संपूर्ण एपिसोड समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. पुण्यातून सुरू झालेला हा उपक्रम देशातील इतर शहरांमध्येही नेण्याची आयोजकांची योजना आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!