AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एनडीच्या या प्रमुख घटक पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी, वातावरण तापलं

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रातील एनडीएचं सरकार आता लवकरच संसदेमध्ये डिलिमिटेशन बिल सादर करण्याच्या तयारीमध्ये आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! एनडीच्या या प्रमुख घटक पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी, वातावरण तापलं
पवन कल्याण यांच्याकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 8:22 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रातील एनडीएचं सरकार आता लवकरच संसदेमध्ये डिलिमिटेशन बिल सादर करण्याच्या तयारीमध्ये आहे. मात्र असं असतानाच घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये परस्परविरोधी भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. गावपातळीवर सर्वांसोबत युती करून आणि एनडीएमधील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवा, असे आदेश मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास सांगितलं आहे.

आंध्र प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, परंतु त्यापूर्वीच एनडीएचे घटक पक्ष असलेल्या आणि आंध्र प्रदेशमधील प्रमुख पक्ष असलेल्या या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा कोणताही परिणाम केंद्र किंवा राज्य स्थरावर दिसणार नाही, असं म्हटलं जातं आहे. मात्र आता एनडीएमधील या दोन्ही घटक पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत तेलगू देसम पार्टीची भूमिका स्पष्ट करताना चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे की, आता पंचायतींच्या विकासावर लक्ष देण्याची वेळ आली आहे. आता राजकीय स्पर्धा संपली आहे. सर्वसंमतीने या निवडणुका लढवल्या जाव्यात मात्र दुसरीकडे जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे, त्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.  त्यामुळे आता आंध्र प्रदेशमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे. चंद्रबाबू यांनी युतीची भूमिका घेतली आहे. मात्र दुसरीकडे पवन कल्याण यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे.  त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!