Weather Update : राज्यात पावसाचं कमबॅक कधी? कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्ट

| Updated on: Aug 15, 2021 | 4:57 PM

महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं 19 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज जारी केला आहे.

Weather Update : राज्यात पावसाचं कमबॅक कधी? कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्ट
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us on

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं 19 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, 19 ऑगस्टला कोणताही ॲलर्ट देण्यात आलेला नाही.

राज्यातील आजची पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

16 ऑगस्टची पावसाची स्थिती कशी?

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस

सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. पहाटेपासून रिमझिम पाऊस  सुरू होता. मात्र, आता पावसाने जोर धरला आहे.

इतर बातम्या:

शास्त्रीय नियोजनाला बीज प्रक्रियेची साथ द्या, तज्ज्ञांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घ्या, छोट्या शेतकऱ्यांना थेट 80 टक्के अनुदान मिळणार

शेतकऱ्यांसाठी भन्नाट मोबाईल अ‍ॅप्स, हवामान, पशुपालन आणि पिकांशी संबंधित माहिती एका क्लिकवर

IMD issue rain alert for Maharashtra and issue Yellow Alert for various district