प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घ्या, छोट्या शेतकऱ्यांना थेट 80 टक्के अनुदान मिळणार

प्रगत मशीन्स केवळ शेतीचा खर्च कमी करत नाहीत, तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळू शकते. दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसह सुधारित शेतीची माहिती दिली.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घ्या, छोट्या शेतकऱ्यांना थेट 80 टक्के अनुदान मिळणार
Micro Irrigation

नवी दिल्लीः पीक सिंचनाची शेतीमध्ये मोठी भूमिका आहे. पीक सिंचनामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी पाणी वाचवू शकतो. विशेष म्हणजे त्याचे दुहेरी फायदे आहेत. प्रगत मशीन्स केवळ शेतीचा खर्च कमी करत नाहीत, तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळू शकते. दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसह सुधारित शेतीची माहिती दिली.

🛑 शेतकरी ठिबक सिंचनाची पद्धत अवलंबू शकतात

कृषी तज्ज्ञांच्या मते, कमी पाण्यात पीक सिंचन करता येते, यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाची पद्धत अवलंबू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, स्प्रिंकलर पाईप्स खरेदी केल्यानंतरही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना किंवा पीएम कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मिळेल. पीएम कृषी सिंचन योजनेअंतर्गत सामान्य शेतकऱ्यांना 80% अनुदान दिले जाते.

🛑 उत्तर प्रदेशात पहिले या आणि पहिल्यांदाच मिळवा

या योजनेत प्रथम येणाऱ्या प्रायोगिक तत्त्वावर लागू केले गेलेय. विशेष म्हणजे शेतकरी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना नोंदणीकृत फर्मकडून स्प्रिंकलर पाईप खरेदी केल्यानंतर बिलासह अर्ज कार्यालयात सादर करावा लागेल.

🛑 शेतकऱ्यांना 80-90 टक्के अनुदान मिळेल

एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना खर्चावर 80-90 टक्के सबसिडी दिली जाते. स्प्रिंकलर सिंचन पद्धतीच्या साहाय्याने तुम्ही जमीन समतल न करता शेतात चांगले पाणी देऊ शकता. उतार आणि कमी उंचीवर सिंचनासाठी ही प्रणाली अत्यंत प्रभावी मानली जाते. लसूण, आले, फुलकोबी, कोबी, बटाटा, मटार, कांदा, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, शेंगदाणे, मोहरी, पालेभाज्या, डाळी, चहा आणि रोपवाटिका या पद्धतीने सिंचन करता येतात, यामुळे पिकाचे चांगले उत्पादन होते. या योजनेंतर्गत बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, अंतर्भूत कंपन्या, उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांचे सदस्य यांनाही लाभ दिला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2021 अंतर्गत केंद्र सरकारने 50000 कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली आहे.

🛑 कोणाला लाभ मिळेल?

💠 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन असावी.
💠 या योजनेचे पात्र लाभार्थी हे देशातील सर्व विभागांचे शेतकरी असतील.
💠 पीएम कृषी सिंचन योजनेंतर्गत बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, निर्गमित कंपन्या, उत्पादक शेतकरी गटाचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही लाभ दिला जाईल.
💠 पीएम कृषी सिंचन योजना 2021 चे फायदे त्या संस्था आणि लाभार्थींना उपलब्ध होतील, जे किमान सात वर्षांसाठी लीज कराराअंतर्गत त्या जमिनीची लागवड करतात. ही पात्रता कंत्राटी शेतीद्वारेही मिळवता येते.

🛑 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2021 ची कागदपत्रे

💠 अर्जदाराचे आधार कार्ड
💠 ओळखपत्र
💠 शेतकऱ्याच्या जमिनीची कागदपत्रे
💠 जमिनीची ठेव (शेतची प्रत)
💠 बँक खाते पासबुक
💠 पासपोर्ट आकार फोटो
💠 मोबाईल नंबर

संबंधित बातम्या

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता, कृषीतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

Take advantage of Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana, small farmers will get 80 per cent subsidy directly

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI