शास्त्रीय नियोजनाला बीज प्रक्रियेची साथ द्या, तज्ज्ञांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन

राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणं महत्वाचं अशल्याचं सांगितलंय. तर, नियोजनाबरोबर बीज प्रक्रिया महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आलंय.

शास्त्रीय नियोजनाला बीज प्रक्रियेची साथ द्या, तज्ज्ञांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 9:08 AM

नाशिक: कांदा म्हटलं की योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होण्याची शक्यता अधिक असते. शेतकऱ्यांचं नियोजनाअभावी नुकसान होऊ नये म्हणून महत्वाचा सल्ला देण्यात आलाय. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणं महत्वाचं अशल्याचं सांगितलंय. तर, नियोजनाबरोबर बीज प्रक्रिया महत्त्वाची असून यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आलंय.

कांदा हे नगदी पीक

भाजीपाला पिकात कांदा हे पिक शेतकरी दष्ट्या महत्वाचे नगदी व निर्यातयोग्य मसाला पीक आहे. कांदा भारतीय लोकांच्या रोजच्या आहारातील अविभाज्य भाग आहे. जागतिक स्तरावरील भाजीपाला पिकाचा क्षेत्रविस्तार लक्षात घेता कांदा हे दुस-या क्रमांकाचे पीक आहे. कांदा हे मुख्यत थंड (हिवाळी) हंगामातील पिक जरी असले मात्र हे खरीप, रांगडा आणि रब्बी या तीन टप्प्यात कांद्याचे पिक घेतले जाते.

नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने खरीप हंगामासाठी कांदा पिकाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे केलेल्या संशोधन समोर आले आहे

कांदा लागवडीचं नियोजन कसं असावं?

कांदा रोपवाटिकेला जागा निवडताना ती समतोल व पाण्याचा निचरा होणारी असणे गरजेचे आहे. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी आठ ते दहा किलो बियाणे वापरावे. कांदा लागवडीच्या जागेभोवती मोठे वृक्ष नसले पाहिजे. गादी वाफे तयार करताना ते तीन मीटर लांब एक मीटर रुंद व 15 सेंटिमीटर उंचीचे असावेत. प्रतिवर्ग मीटरमध्ये चार ते पाच ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन मिसळून प्रत्येक गादीवाफ्यात 15 ते 20 किलो ग्रॅम शेणखत किंवा आठ ते दहा किलो ग्रॅम गांडूळखत टाकावे. कांदा वाफ्यात 5 ते 7 सेंटीमीटर अंतरावर एक सेमी खोलीच्या ओळी पाडून त्यात बियाणे टाकावे. बियाण्यास प्रति किलो दोन ग्रॅम कॅप्टन अथवा थायरम चोळल्यास रोपे कोलमडत नाही. रोपे पंधरा दिवसांची झाल्यानंतर मररोग होण्याची अथवा ते कोलमडून जाण्याची शक्यता असल्याने एक लिटर पाण्यात तीन ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईडची फवारणी रोपांच्या मुळाजवळ केल्यास फायदा होतो.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने कांदा लागवडी अगोदर कांदा रोपे तयार करतांना नियोजन केले पाहिजे. यामुळे कांदा रोपांवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. एकदा तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) ला भेट देण्याचे आवाहन सहाय्यक संचालक डॉ आर. सी. गुप्ता यांनी केलं आहे.

इतर बातम्या:

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता, कृषीतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

NHRDF appeal to farmers done onion seed processing before cultivation for better income and crop

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.