AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Price Today: जुन्नरच्या बाजारसमितीत 13 हजार बॅगा कांद्याची आवक, कांद्याचा आजचा दर किती?

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला.

Onion Price Today: जुन्नरच्या बाजारसमितीत 13 हजार बॅगा कांद्याची आवक, कांद्याचा आजचा दर किती?
जुन्नर बाजार समिती
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 14, 2021 | 4:27 PM
Share

जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, जुन्नर पुणे: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला. तसेच दोन कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला.तर गोल्टा काद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसुन येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थीर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कांद्याला 20 रुपयांचा दर

पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. कांदा बाजारसमितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात आली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोला 200 रूपये बाजारभाव मिळाला. म्हणजेच शेतकऱ्यांना एका किलोला 20 रुपयांचा दर मिळाला.

कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता

एक नंबरच्या कांद्याला 20 रुपयेचा दर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला. तर, गोल्टा कांद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसून येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थिर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

जुन्नर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला 20 रुपयांचा दर मिळाला असला तर शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

कांदा लावताना बीजपक्रिया करण्याचं आवाहन

कांदा म्हटलं कि योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होतात. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची गरज समोर आलीय. नियोजनासोबत बीज प्रक्रिया महत्त्वाची असून यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आलंय. भाजीपाला पिकात कांदा हे पिक शेतकरी दष्ट्या महत्वाचे नगदी व निर्यातयोग्य मसाला पीक आहे. कांदा भारतीय लोकांच्या रोजच्या आहारातील अविभाज्य भाग आहे. जागतिक स्तरावरील भाजीपाला पिकाचा क्षेत्रविस्तार लक्षात घेता कांदा हे दुस-या क्रमांकाचे पीक आहे. कांदा हे मुख्यत थंड (हिवाळी) हंगामातील पिक जरी असले मात्र हे खरीप, रांगडा आणि रब्बी या तीन टप्प्यात कांद्याचे पिक घेतले जाते.

इतर बातम्या

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता, कृषीतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

Onion Price Today Junnar APMC more thirteen thousand bag onion came for auction farmers get twenty rupees rate

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?