AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहो, सोने पुन्हा स्वस्त; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत गुरुवारी (23 सप्टेंबर) सोने (gold) स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46600 रुपये नोंदवले गेले.

अहो, सोने पुन्हा स्वस्त; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!
सोने पुन्हा स्वस्त.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 23, 2021 | 2:53 PM
Share

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत गुरुवारी (23 सप्टेंबर) सोने (gold) स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46600 रुपये नोंदवले गेले. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,600 per 10 grams)

सोन्या-चांदींच्या दागिन्यांचे भारतीयांना भारी आकर्षण. आता गुंतवणूक म्हणूनही तिकडे ओढा वाढतो आहे. इथल्या गुंतवणुकीचा परतावा खणखणीत वाजवून मिळतो. त्यामुळे बहुतांश जण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात. नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46600 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 रुपये होते. या तुलनेत आजचे दर जवळपास 300 रुपयांनी स्वस्त झालेले पाहायला मिळाले. 22 कॅरेट सोन्याचे दर गुरुवारी 45250 होते. हेच दर बुधवारी 10 ग्रॅममागे 45500 रुपये होते. यातही जवळपास 250 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी चांदीचे दर किलोमागे 61200 होते. विशेष म्हणजे बुधवारीही हेच दर कायम होते. सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

झळाळी अजून वाढणार

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

‘गुगल पे’वरुनही सोने खरेदी

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजार पेठेत गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46600 रुपये होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 45250 होते. चांदीचे दर किलोमागे 61200 रुपये होते. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, नाशिक (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,600 per 10 grams)

इतर बातम्याः

नाशिकः सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव 40 हजारांवरून चक्क 95 हजारांवर

नाशिकः शेतकऱ्यांची लूट करायची इरसाल पद्धत; पठ्ठ्यांनी बाजार समितीच्या वजन काट्यालाच बांधला दगड

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ