सावधान! घराबाहेर पडताना छत्री घेऊनच निघा, राज्यात वादळी पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..

Weather Forecast : राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. आज जवळपास संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा जारी केला. मॉन्सून राज्यात दाखल झाला.

सावधान! घराबाहेर पडताना छत्री घेऊनच निघा, राज्यात वादळी पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..
Rain with gusty winds
| Updated on: Jun 08, 2026 | 7:38 AM

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला. आज भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्याचा मोठा इशारा दिला. सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी या भागात जोरदार पाऊस येण्याचा अंदाज आहे. बाकी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यातील अनेक भागात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. आसाम, अरूणाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, ओडिसा, छत्तीसगड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांकडे मॉन्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. राज्यात मॉन्सून दाखल झाला असून अनेक भागात पावसाला सुरूवात देखील झाली. शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. अखेर राज्यात पाऊस दाखल झाला आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे. देशातील इतरही राज्यात हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला. परभणी जिल्ह्यातील अनेक भागात सायंकाळच्या सुमारास सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. पूर्णा शहरात जोरदार पाऊस झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.

करमाळा शहरासह देवळाली व रोशेवाडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. देवळाली येथील एका घरावरील पत्रे उडाल्यानंतर त्यावरील दगडखाली पडून दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. वादळी वाऱ्यामुळे परिसरात काही प्रमाणात मालमत्तेचेही नुकसान झाले. पावसासोबतच मोठे वादळ सुटल्याने हे नुकसान झाले. सांगली शहरामध्ये मान्सून पूर्व पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पाऊसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. सकाळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे चित्र काहीसं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगली शहरांमध्ये अनुभवायला मिळत आहे. सायंकाळी देखील विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.

Follow Us