Heat Wave : पत्र्यांच्या घरांमधील लोकांचं “विस्तवा”वरचं जीवन, उष्णतेच्या लाटेमुळे सहनही होतं नाही अन् सांगता येत नाही

| Updated on: May 12, 2022 | 1:34 PM

मोठ्या माणसांना पत्र्यांच्या घरांमध्ये उकाड्याचा प्रचंड त्रास होतो. तर लहान मुलांचे काय ? उकाड्यामुळे चिमकुल्यांना झोपविण्यासाठी रात्रभर मांडीवर घेवून अन् हवा घालत झोपवावे लागते. झोप होत नसल्याने मुले चिडचिड करतात.

Heat Wave : पत्र्यांच्या घरांमधील लोकांचं विस्तवावरचं जीवन, उष्णतेच्या लाटेमुळे सहनही होतं नाही अन् सांगता येत नाही
उष्णतेच्या लाटेमुळे सहनही होतं नाही अन् सांगता येत नाही
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव – राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) आली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सुध्दा प्रचंड ऊन असून लोकांना उकाड्याचा त्रास होतं आहे. उकाडा घालविण्यासाठी पंखा अन् कुलरची हवा सुध्दा पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सध्या ज्यांची घरे पत्र्यांची आहेत. त्यांना उकाड्याचा प्रचंड त्रास जाणवत आहे. तसेच त्यांच्या घरात पंखा सुध्दा नाही, ती लोकं या प्रचंड उष्णतेच्या लाटेत पत्र्यांच्या घरांमध्ये कसं जीवन जगत असतील. हा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. पत्र्यांच्या घरांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांसह आबाळ वृध्द यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतं आहे. जळगाव जिल्ह्यात अशी कुटुंबे आहेत. ती पत्र्याच्या घरात आयुष्य जगत आहेत. जळगाव जिल्ह्यात सध्या तापमान (Temperature) अधिक आहे.

जळगाव जिल्ह्यात 46 अंशावर तापमान

जळगाव जिल्हृयात उष्णतेचा पारा 46 अंशावर जावून पोहचला आहे. उष्णतेची लाट व त्यामुळे होणारा प्रचंड उकाड्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. जळगावात अशीही काही कुटुंबे आहेत. ती अनेक वर्षांपासून पत्र्यांच्या घरांमध्ये राहतात. घरांमध्ये साधा पंखा सुध्दा नाही. यंदा उष्णतेची प्रचंड लाट असल्याने या लोकांनाही उकाड्याचा त्रास असह्य झाला आहे. उन्हामुळे दिवसभर पत्रे तापतात. घरात जमीन सुध्दा तापलेले असते. त्यामुळे प्रचंड गरमी होते. तर बाहेर उन्हामुळे प्रचंड गरम वाफा अशा त्रासात दिवस घालवावा लागतो. सकाळी पहाटेच्या वेळी डोळा लागतो. उकाड्याच्या त्रासामुळे रात्री झोप सुध्दा लागत नाही. तर दिवसा बाहेरील झाडाच्या सावलीचा सहारा घ्यावा लागतो. प्रचंड उष्णतेमुळे पत्र्याच्या घरात दिवस काढणं मुश्कील झालं आहे असं संत्रीबाई चव्हाण यांनी सांगितलं आहे.

झोप पुर्ण होत नसल्याने मुलं चिडचिड करतात

मोठ्या माणसांना पत्र्यांच्या घरांमध्ये उकाड्याचा प्रचंड त्रास होतो. तर लहान मुलांचे काय ? उकाड्यामुळे चिमकुल्यांना झोपविण्यासाठी रात्रभर मांडीवर घेवून अन् हवा घालत झोपवावे लागते. झोप होत नसल्याने मुले चिडचिड करतात. वृध्दांनाही उकाड्यामुळे झोप होत नसल्याने इतर शारिरीक व्याधींचा सामना करावा लागतो. यंदा तर उष्णतेची लाट असल्यामुळे घरातील भांडे असो, पाणी सर्व वस्तू चटका लागेपर्यंत तापत आहेत. नशीबी दारिद्रय असल्यामुळे पत्र्याच्या घरात राहण्याची वेळ आली. इतर काही नको किमान पाण्याची समस्या तरी दूर करा, अशी भावना मेहरुणमधील नागरिक शांताराम साळुंखे यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा