आव्हाड यांचं नवं ट्विट…आव्हाड यांचा रोख कुणावर…म्हणाले कोर्टात गेलं तर कोण फासावर जाईल…

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणावरून राज्यभर पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

आव्हाड यांचं नवं ट्विट...आव्हाड यांचा रोख कुणावर...म्हणाले कोर्टात गेलं तर कोण फासावर जाईल...
Image Credit source: Google
| Updated on: Nov 22, 2022 | 2:03 PM

ठाणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर मागील आठवड्यात झालेल्या कारवाईच्या संदर्भात ट्विट केले आहेत. त्यावरून पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकाच आठवड्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. हर हर महादेव चित्रपटावरुन चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी आणि महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आमदारकीचा राजीनामा देखील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला होता. जितेंद्र आव्हाड यांना यादरम्यान जामीनही मंजूर झाला होता. एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणावरून राज्यभर पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावरून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे, माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले.

त्या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही.

वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाहीये.

आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, कि ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्र ला माहीत आहे. अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

आव्हाड यांनी त्यांच्यावर कारवाई केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर निशाण साधत असतांना त्यांनी त्यांना आदेश कुठून आले आहेत असं म्हणत विरोधकांवरही निशाण साधला आहे.