AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये मद्यधुंद टँकर चालकाचा धुमाकूळ, 2 रिक्षांसह 7-8 दुचाकींना धडक, 5 जण जखमी

Kalyan Tanker Accident : दारूच्या नशेत भरधाव वेगाने पाण्याचा टँकर चालवत कल्याणमध्ये एका चालकाने दोन रिक्षा आणि तब्बल 7 ते 8 दुचाकींना धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.

कल्याणमध्ये मद्यधुंद टँकर चालकाचा धुमाकूळ, 2 रिक्षांसह 7-8 दुचाकींना धडक, 5 जण जखमी
Kalyan Tanker AccidentImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 29, 2026 | 4:47 PM
Share

कल्याणच्या रामबाग स्टेशन रोड परिसरात मद्यधुंद टँकर चालकाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने पाण्याचा टँकर चालवत या चालकाने दोन रिक्षा आणि तब्बल 7 ते 8 दुचाकींना धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. सुदैवाने रस्त्यावरून जाणारे अनेक पादचारी आणि नागरिक थोडक्यात बचावले. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

मद्यधुंद चालकाचा कहर

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी कुमार गुल्लू असे या मद्यधुंद टँकर चालकाचे नाव आहे. हा टँकर साईबाबा वॉटर सप्लायर कंपनीचा असल्याची माहिती आहे. चालकाने रामबाग क्रमांक 3, आंबेडकर रोड, ताल हॉटेल ते पुष्पराज हॉटेल या मार्गावर चालकाने बेफाम पद्धतीने टँकर चालवला. यादरम्यान टँकरने दोन रिक्षांसह 7 ते 8 दुचाकींना धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले. टँकरच्या धुमाकुळामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भरधाव टँकरचा हा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, नागरिक आणि रिक्षाचालकांनी टँकर चालकाला थांबवण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, चालकाने टँकरचा वेग कमी करण्याऐवजी आणखी वाढवला. अखेर भरधाव टँकर डिव्हायडरला धडकल्यानंतर नागरिकांनी चालकाला पकडले. संतप्त नागरिकांनी मद्यधुंद चालकाला चोप देत त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले.

चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

दरम्यान, या घटनेत जखमी झालेले नागरिक आणि रिक्षाचालक महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून मद्यधुंद टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास केला जात असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही पुढील कारवाई केली जात आहे. गुन्हा दाखल करून या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे आता पोलिस या चालकावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट