शाहू महाराज छत्रपतींचा खरा अपमान तर मविआने केलाय, कारण…; भाजप नेत्याचा राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Apr 27, 2024 | 1:56 PM

Dhananay Mahadik on Sanjay Raut and Narendra Modi Kolhapur Sabha : नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. संजय राऊत यांनी सकाळी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या टीकेला भाजपकडून उत्तर देण्यात आलंय.

शाहू महाराज छत्रपतींचा खरा अपमान तर मविआने केलाय, कारण...; भाजप नेत्याचा राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
Follow us on

नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवारी धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सभे आधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलंय.

भाजपचं प्रत्युत्तर

शाहू महाराज छत्रपतींचा सन्मान महायुतीने केला आहे. महाविकास आघाडीने त्यांचा अपमानच केलाय. महाविकास शाहू छत्रपतींना राज्यसभेवर पाठवता आला असतं. काँग्रेसने जे पॅम्प्लेट छापले आहेत. त्यावर राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे फोटो सुद्धा नाहीत. राहुल गांधीचा फोटो छापला तर मत सुद्धा मिळणार नाहीत, असा विश्वास त्यांना आहे. त्यांचा सन्मान करायचा होता तर राहुल गांधी प्रियांका गांधी महाराजांचा अर्ज भरायला का आले नाहीत?, असं म्हणत भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

नरेंद्र मोदींच्या सभेवर म्हणाले…

कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदींची सभा व्हावी असा सर्वांचा आग्रह होता. आजची कोल्हापुरातील नरेंद्र मोदी यांची सभा न भूतो न भविष्यती अशी होईल. या सभेनंतर दोन्ही उमेदवारांचा गुलाल निश्चित होईल. निवडणुका या विकासात्मक मुद्द्यावर व्हायला हव्यात. पण विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. संविधान खतरे मी आहे देश खतरे मी आहे, असा प्रचार ते करत आहेत. अशा प्रचारावर लोक विश्वास ठेवत नाही, असं धनंजय महाडिक म्हणालेत.

घटक पक्षांचा सन्मान कसा करायचा? देखील नरेंद्र मोदींनी देशाला दाखवून दिला आहे. जानकरांनंतर आता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना प्रचाराला ते येत आहेत. मोदी फक्त भाजपचाच प्रचार करतात असं बसवण्याचा प्रयत्न केला. सभेनंतर आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, अशी घोषणा करायला सुद्धा हरकत नाही, असंही धनंजय महाडिक म्हणालेत.