AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात खासदार धैर्यशील मानेंसमोर आंदोलक महिलांच्या पंचगंगा नदीत उड्या

मायक्रोफायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलांचे (Kolhapur Flood affected women protest) आंदोलन आणखी चिघळले. आंदोलक महिलांनी थेट पंचगंगा नदीत उड्या मारल्या.

कोल्हापुरात खासदार धैर्यशील मानेंसमोर आंदोलक महिलांच्या पंचगंगा नदीत उड्या
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 03, 2020 | 3:09 PM
Share

कोल्हापूर : मायक्रोफायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलांचे (Kolhapur Flood affected women protest) आंदोलन आणखी चिघळले. आंदोलक महिलांनी थेट पंचगंगा नदीत उड्या मारल्या. पूरग्रस्त महिलांनी  (Kolhapur Flood affected women protest) थेट नदीत उड्या घेऊन आंदोलन केलं. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासमोरच नदीत उड्या घेतल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. छत्रपती शासन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं.

या महिलांनी गेल्या तीन दिवसांपासून पंचगंगा नदीत आंदोलन सुरु केलं आहे. मायक्रोफायनान्सचे कर्ज माफ करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलक महिलांचं निवेदन स्वीकारण्यासाठी खासदार धैर्यशील माने आंदोलनस्थळी आले होते. त्यावेळी महिलांनी थेट नदीत उड्या घेत आंदोलन केलं.

यावेळी उपस्थित पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. खासदार धैर्यशील माने स्वत:ही पाण्यात उतरुन आंदोलक महिलांना बाहेर येण्याचं आवाहन करत होते. शिवाय पोलिसांनीही  पाण्यात उतरुन महिलांना नदीबाहेर आणलं.

दरम्यान, याच महिलांनी गेल्या महिन्यातही आंदोलन केलं होतं. त्यावेळी महिलांनी पुणे-बंगळुरु महामार्गावर आंदोलन केलं. हायवेवर चूल मांडून महिलांनी पूरग्रस्तांना (Kolhapur Flood affected women protest) न्याय देण्याची मागणी केली. महिलांनी अक्षरशः संसार थाटत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला होता.

संबंधित बातम्या  

कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांनी हायवेवर चूल मांडली, पुणे-बंगळुरु हायवेवरच ठिय्या  

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...