महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? मराठा समाजासाठी 8 योजनांची घोषणा होताच लक्ष्मण हाकेंचा सवाल

Laxman Hake : राज्य सरकार मराठा समासाठी तब्बल 8 योजना सुरू करणार आहे. ज्यामुळे मराठ्यांना आता ओबीसींप्रमाणे सुविधा मिळणार आहेत. यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? मराठा समाजासाठी 8 योजनांची घोषणा होताच लक्ष्मण हाकेंचा सवाल
laxman hake on Maratha 8 Scheme
Image Credit source: Google
| Updated on: Jun 05, 2026 | 8:21 PM

मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल आहे. आता ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. या सवलती शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत असणार आहेत. मराठा समासाठी तब्बल 8 योजना सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील मराठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हाके नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? – हाके

मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसी समुदायातील योजनांना निधी नाही, ओबीसी महामंडळांना अध्यक्ष नाही. समाज कल्याण विभागाचा हजारो कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवला जातो. ओबीसी समुदायातील 18 महामंडळाची घोषणा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारने केली होती.पण त्या 18 महामंडळाला साधा अध्यक्षही नाही आणि निधी सुद्धा नाही, कार्यालय नाही आणि शिपाई पण नाही. महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?

विद्यार्थ्यांना सवलती मिळत असतील तर स्वागत…

महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी विद्यार्थ्यांना काही सवलती देणार असाल तर त्याचं स्वागत लक्ष्मण हाके करणार आहे. पण महा ज्योतीला जो निधी मिळतो तो सार्थीच्या तुलनेत किती मिळतो असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. आठ लाख करोड रुपयांच्या बजेटमध्ये 50% हुन अधिक जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्धा टक्क्याची बजेटची तरतूद असावी. फडणवीस साहेब तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, परंतु ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्यात. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना तुम्ही रेड कार्पेट आजही घालता, आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देत आहात. आजही तुम्ही एससी एसटी आणि ओबीसी बांधवांवर अन्याय करत आहात, तुमच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो.

मराठा समाजासाठी या योजना सुरू होणार

  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
  • मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना
  • विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना
  • ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी ही पात्र असतील.
  • ओबीसी विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात.
  • ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील.
Follow Us