AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आता मराठ्यांना ओबीसींसारख्याच सवलती… फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; तब्बल 8…

राज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत. शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरु केल्या जाणार आहेत.

मोठी बातमी! आता मराठ्यांना ओबीसींसारख्याच सवलती... फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; तब्बल 8...
Maharashtra government big decision fo maratha communityImage Credit source: Google
| Updated on: Jun 05, 2026 | 7:41 PM
Share

राज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत. शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरु केल्या जाणार आहेत. त्यामुळे मराठा समाजाला मोठा फायदा होणार आहे. या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मराठा समाजासाठी या योजना सुरू होणार

  1. शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
  2. मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
  3. माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना
  4. विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना
  5. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना
  6. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी ही पात्र असतील.
  7. ओबीसी विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात.
  8. ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील.

फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली – महाजन

राज्य सरकारच्या या निर्णयावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी आहेत अशी जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्यात आली. आमच सरकार गेल, उद्धवजींच्या काळात या विषयाकडे कुणी लक्ष दिलं नाही. मात्र आता मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मराठा समाजाला न्याय देऊन त्यांनी आपली मराठा समाजासाठी असलेली भूमिका स्पष्ट केली आहे.

Follow Us
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा