LIVE : कोल्हापुरात वीजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एकाच क्लिकवर

LIVE : कोल्हापुरात वीजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू
Picture

कोल्हापुरात वीजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू

13/08/2019,7:41PM
Picture

कलम 370 प्रकरणी तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याप्रकरणी तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, स्थिती सामान्य करण्यासाठी केंद्र सरकारला काही काळाची मुदत देण्याचं सुप्रीम कोर्टाचं मत

13/08/2019,1:33PM
Picture

कोल्हापुरातील प्रत्येक ग्रामपंचायतीला एक लाखांची मदत

कोल्हापूर : प्रत्येक ग्रामपंचायतीला राज्य सरकारकडून एक लाख रुपयांची मदत, पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

13/08/2019,1:11PM
Picture

शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ करा : राजू शेट्टी

कोल्हापूर : महापुरामुळे पाच हजार कोटींच्या ऊसाचं नुकसान, एकरी अडीच ते पावणे तीन लाखांचं नुकसान, शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ करण्याची गरज, राजू शेट्टी यांची मागणी

13/08/2019,1:03PM
Picture

डीएसकेंचा भाऊ मुंबई विमानतळावर ताब्यात

पुणे : डीएसके घोटाळ्यातील बिल्डर डी एस कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी अमेरिकेला पळून जाताना ताब्यात, मुंबई विमानतळावर कारवाई

13/08/2019,11:48AM
Picture

औरंगाबादमधील मेडिकल चालकांची पूरग्रस्तांना पाच लाख रुपयांच्या औषधांची मदत

औरंगाबाद : मेडिकल चालकांची पूरग्रस्तांना पाच लाख रुपयांच्या औषधांची मदत, हरिश्चंद्र मित्तल आणि निखिल मित्तल असं या मेडिकल चालकांचे नाव, पूरग्रस्तांची दयनीय परिस्थिती पाहून अनेक औषध कोल्हापूर, सांगलीला पाठवली, यामध्ये थंडी, ताप, जखमा, पाण्यामुळे होणारे आजार, त्वचेचे आजार, गर्भवती महिलांसाठी लागणारी औषधे, कॅल्शियमच्या गोळ्या, लहान मुलांचे सगळे विकार या आजारावरची तब्बल पाच लाख रुपयांची औषधं पाठवली

13/08/2019,11:42AM
Picture

शरद पवार दोन दिवस सांगली-कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरग्रस्तांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करणार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्तांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करणार, शिरोळमध्ये 15 ऑगस्टला झेंडावंदन, 14 आणि 15 ऑगस्टला शरद पवार सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर, या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन सुरु असलेले मदतकार्य आणि लोकांना भेट देणार

13/08/2019,10:50AM
Picture

उल्हासनगरातील एकदिवसापूर्वी खाली केलेली धोकादायक इमारत कोसळली

उल्हासनगर : धोकादायक असलेली पाच मजली मेहक इमारत कोसळली, मंगळवारी सकाळी 10 वाजताची घटना, एकदिवापूर्वी सोमवारी इमारत खाली करुन सीलबंद केल्याने मोठी जीवितहानी टळली, पालिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

13/08/2019,10:43AM
Picture

कोल्हापुरातील पुरामुळे मुंबईत भाज्या महागल्या

मुंबई : महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूरमध्ये महापूराचा भाज्यांना फटका, मुंबईत भाज्या महागल्या, भाज्याची वहातूक करणाऱ्या वाहनांचा रस्ता वळवल्याने भाज्या महागल्याची माहिती, भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ

13/08/2019,10:38AM
Picture

कोल्हापुरातील जमावबंदी आदेश मागे

कोल्हापूर : सोमवारी सकाळी लावण्यात आलेली जमावबंदी आदेश रात्री मागे, एका दिवसाच्या आत आदेश मागे, सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर प्रशासनाचा निर्णय

13/08/2019,10:34AM
Picture

नागपूरवरुन दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड

नागपूर : दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच विमानाने दिल्लीला जाणार होते, सकाळी 7:30 ची घटना, उड्डाणापूर्वीच बिघाड झाल्याने विमानाला विलंब

13/08/2019,10:32AM
Picture

कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळदार पावसाचा इशारा, पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीची चिंता वाढली

13/08/2019,10:29AM
Picture

डहाणू, तलासरी परिसरात मध्यम स्वरुपाच्या भूकंपाचा धक्के

पालघर : डहाणू, तलासरी परिसरात पहाटे 5.38 च्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल क्षमेतच्या भूकंपाचा धक्के, भूकंपाने कुठलीही जीवितहानी नाही, काही भागातील घरांना तडे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

13/08/2019,10:29AM
Picture

कशेडी घाटातून एकेरी वाहतूक सुरु

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून एकेरी वाहतूक सुरु, घाटात टँकरमधील गॅस गळतीमुळे थांबवलेली एका दिशेची वाहतूक रवाना

13/08/2019,10:35AM
Picture

पालघरमध्ये भरधाव एसटीचा अपघात, 50 विद्यार्थी जखमी

पालघर : वाडा येथे शाळेच्या बसचा अपघात, अपघाताता 50 विद्यार्थी जखमी, वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

13/08/2019,10:28AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *