Corona Live : नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद, पोलिसांचं आवाहन

Corona Live : नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद, पोलिसांचं आवाहन
Picture

नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद, पोलिसांचं आवाहन

18/03/2020,3:47PM
Picture

कोरोना व्हायरसमुळे दहा रुपयात कोंबड्यांची विक्री

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागामध्ये बॉयलर कोंबड्या दहा रुपये याप्रमाणे विकल्या जात आहेत. या कोंबड्या विकत घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

18/03/2020,12:54PM
Picture

औरंगाबादमध्ये कोरोना संशयितांची संख्या वाढली

औरंगाबादमध्ये कोरोना संशयितांची संख्या 7 वर पोहोचली आहे. संशयितांचे नमुने टेस्टसाठी रवाना, सातही जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

18/03/2020,12:00PM
Picture

राज्यातील कापूस खरेदी केंद्र आजपासून बंद

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकारच्या आदेशानं कापूस खरेदी केंद्र आजपासून बंद करण्यात आलं आहे. पणन महासंघानं हा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशपर्यंत खरेदी केंद्र बंद राहणार

18/03/2020,11:26AM
Picture

नागपुरातील दीक्षाभूमी आजपासून बंद

नागपुरातील दीक्षाभूमी आजपासून बंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता दीक्षाभूमी प्रशासनाने हा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या सूचनेवरुन 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

18/03/2020,11:23AM
Picture

कोरोनामुळे विवाहसोहळा पुढे ढकलला

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नांदेडमधील एका कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह सोहळा पुढे ढकलला आहे. मधूलिकाचा विवाह आशिष मुदिराज यांच्यासोबत 19 मार्च रोजी ठरला होता. लग्न सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली होती. पण कोरोनामुळे हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

18/03/2020,11:20AM
Picture

कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी चालले गावाला, खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट

18/03/2020,11:15AM
Picture

बससाठी आणखी 20 मिनिटं थांबा, पुण्यात PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द

18/03/2020,11:14AM
Picture

पुण्यात कोरोनाग्रस्त वाढले, 'फ्रान्स रिटर्न' महिलेला लागण

18/03/2020,11:13AM
Picture

राज्यातील कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन द्या, कारागृह महानिरीक्षकांची न्यायालयाकडे मागणी

18/03/2020,11:12AM
Picture

गाड्यांमधील सीट कव्हर, कुशन्स काढून टाका, वाहतूक आयुक्तांचे आदेश

गाड्यांमधील सीट कव्हार, कुशन्स काढून टाका, असे आदेश पुण्याच्या वाहतूक आयुक्तांनी बस ट्रॅव्हल्स, टॅक्सी चालकांना दिले आहेत. तसेच खिडक्यांमधील पडदे काढण्याचे सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्तांकडून आदेश

18/03/2020,9:46AM
Picture

पुण्यात तीन दिवस सलून बंद राहणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सलून तीन दिवस बंद राहणार आहेत. दिवसेंदिवस कोरोना आजाराचा शिरकाव वाढत असल्याने नाभिक संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला.

18/03/2020,9:30AM
Picture

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 18, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे. हा रुग्ण फ्रान्स आणि नेदरलँडमधून फिरुन आला होता. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी माहिती दिली.

18/03/2020,8:51AM
Picture

सोन्याच्या दरात दोन हजारांनी घट

सोन्याचे दर दोन हजारांनी तर चांदीचे दर सात हजारांनी घटले आहेत. कोरोनामुळे सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.

18/03/2020,8:43AM
Picture

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर 31 तारखेपर्यंत बंद

सोलापूर येथील अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे मंदिर 31 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. वटवृक्ष मंदिर, समाधी मठ, यात्री निवास बंद करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा बंद राहणार आहेत. तसेच सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरही बंद राहणार आहे.

18/03/2020,8:41AM
Picture

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद

करवीन निवासिनी अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद केल्याने मंदिराच्या आवाराच शुकशुकाट झाला आहे. मोजके पुजारी आणि सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात आहे.

18/03/2020,8:37AM
Picture

नागपूरमधील कोराडी महालक्ष्मी मंदिर बंद

नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कोराडी महालक्ष्मी मंदिरात काल रात्रीपासून दर्शन बंद करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी महालक्ष्मी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात हजारो लोक दर्शनाला येतात.

18/03/2020,8:34AM
Picture

तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. चैत्र पोर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. मंदिर बंद असल्याने इथल्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. काही भाविक तेथील शिखर आणि कळसाचे दर्शन घेत आहेत.

18/03/2020,8:29AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *