LIVE: मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद
Picture

मराठा आरक्षण खटला सुप्रीम कोर्टात जिंकता येणार नाही : श्रीहरी अणे

14/09/2020,1:43PM
Picture

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, आंदोलनाची भूमिका घेतल्याने 149 कलमाखाली कारवाई, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस

14/09/2020,1:17PM
Picture

मराठा आरक्षणप्रश्नी खासदारांनो एक व्हा, खासदार संभाजीराजे यांचे आवाहन

14/09/2020,1:43PM
Picture

केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप, 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंदची हाक, माळशिरस तालुक्यातील बैठकीत मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

14/09/2020,1:13PM
Picture

मराठा आरक्षणाबाबच्या 10 महत्वाच्या घडामोडी | 14 September 2020

14/09/2020,1:46PM
Picture

कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद, मराठा नेते सुरेश दादा पाटील यांची माहिती, परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार, लोकसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील 48 खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा

14/09/2020,1:07PM
Picture

सरकारला आरक्षण टिकवायचं नव्हतं, शिवसंग्राम नेते विनायक मेटेंचा आरोप

14/09/2020,1:46PM
Picture

सरकार आणि वकील यांच्यात समन्वय नाही : संभाजीराजे

सरकार आणि वकील यांच्यात समन्वय नाही, मराठा आरक्षणामध्ये भूमिका मांडताना कुठे कमी पडलो यावर संशोधन व्हावं, महाराष्ट्राचे महाधिवक्ता एकही सुनावणीदरम्यान हजर नव्हते, आपली भूमिकाही मांडली नाही, ही भूमिका संशयास्पद, खासदार संभाजीराजे यांचे गंभीर आरोप

14/09/2020,12:35PM
Picture

VIDEO: 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 14 September

14/09/2020,12:34PM
Picture

चीन सीमेवर 20 जवानांच्या हत्येस जबाबदार धरुन पंतप्रधान-संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी : सामना

14/09/2020,12:33PM
Picture

जालन्यात शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी मनसे आक्रमक

जालन्यात शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी मनसे आक्रमक, शहरातील जुना मोंढा येथील अग्रणी बँकेसमोर मनसेचं अनोखं आंदोलन, विजय मल्यारुपी चेहरा परिधान करुन जिल्ह्यातील बँकांचा निषेध, शेतकऱ्यांना कर्ज मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा

14/09/2020,12:31PM
Picture

डोक्याला दुखापत, कंबरेपाशी चिरफाड, नंतर मृतदेहांचीही अदलाबदल, मुंबईतील सायन रुग्णालयाचा प्रताप

14/09/2020,12:33PM
Picture

सोलापूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

सोलापूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, वंचित एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेतील आयुक्तांची खुर्ची महापौरांच्या दालनात आणली, वारंवार सर्वसाधारण सभेला उशीर होत असल्याची नगरसेवकांची तक्रार, सकाळी 11 वाजता सुरु होणारी सभा 12 वाजले तरी सुरु झालेली नाही

14/09/2020,12:25PM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *