AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, पुणे ते नागपूर, 31 मार्चपर्यंत कुठे काय बंद राहणार?

ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. (Uddhav Thackeray Shops Offices Closed)

मुंबई, पुणे ते नागपूर, 31 मार्चपर्यंत कुठे काय बंद राहणार?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 20, 2020 | 2:01 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुंबई MMRDA भाग, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, वैद्यकीय सुविधा, बँक अशा जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सर्व कार्यालये बंद राहतील, ज्यांना शक्य त्यांनी घरातून काम करा, सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता 50 टक्क्यांवरुन 25टक्क्यांवर आणणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. (Uddhav Thackeray Shops Offices Closed)

सध्या जगात अशी वेळ आलीय, जगण्यासाठी घरात थांबणं आवश्यक आहे. पुढचे 15-20 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. संपर्क टाळणे हे एकमेव शस्त्र आहे. मात्र आपल्या काळजीपायी अत्यंत नाईलाजाने महाराष्ट्र सरकार काही निर्णय घेत आहे. कदाचित आपल्याला रुचणार नाही. रेल्वे आणि बस मुंबई शहराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या बंद करणे सोपे आहे, परंतु पालिका, स्वच्छता, आरोग्य अशा अत्यावश्यक कर्मचारीवर्गाची गैरसोय होईल. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ज्या कारणामुळे आपण ट्रेन, बस आपण वापरत आहोत, ती कारणं आपण बंद केली आहेत. ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला कोरोनाविषयक चित्रपट मुख्यमंत्री कार्यालय ट्वीटरवर शेअर केला, जरूर पहा. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरुण धवन, आयुषमान खुराणा, आलिया भट, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनी योगदान दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (Uddhav Thackeray Shops Offices Closed)

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 52 रुग्ण आहेत, मात्र 5 रुग्ण आता व्हायरसमुक्त झाले आहेत. त्यांच्यावर पुढील 14 दिवस देखरेख ठेवली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पुढे आर्थिक संकट उद्भवेल, याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु आहे. त्यावर मात करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत, त्यांचा पगार मालकांनी कापू नये, माणुसकी टिकवण्याची वेळ आहे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

ही फिरण्याची सुट्टी नाही, सर्वांनी घरी बसून काळजी घ्यावी. काही लढाया रणांगणात लढाव्या लागतात, आपण घरात बसून या लढाईवर विजय मिळवायचा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray Shops Offices Closed)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ