LIVE | Delhi corona update | दिल्लीमध्ये कोरोनाचे 407 नवे रुग्ण, आतापर्यंत 10941 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | Delhi corona update | दिल्लीमध्ये कोरोनाचे 407 नवे रुग्ण, आतापर्यंत 10941 जणांचा मृत्यू
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 14 Mar 2021 16:44 PM (IST)

  Delhi corona update | दिल्लीमध्ये कोरोनाचे 407 नवे रुग्ण, आतापर्यंत 10941 जणांचा मृत्यू

  दिल्लीमध्ये आणखी 407 नवे कोरोनाग्रस्त आढळले. ताज्या माहितीनुसार आज 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे.  दोन रुग्णांना मिळून दिल्लीमध्ये मृतांची संख्या 10,941 वर पोहोचली.

 • 13 Mar 2021 22:46 PM (IST)

  अकोला : आज दिवसभरात 417 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत

  1813 अहवालात पैकी 1396 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत

  एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 21062 वर पोहोचला असून येथे दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झालाय

  अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू

  अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 335  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या अकोल्यात 5034 जणांवर उपचार सुरु आहेत.

 • 13 Mar 2021 19:40 PM (IST)

  मुंबईत 1 हजार 709 कोरोनाचे नवे रुग्ण, सध्या 1500 जणांवर उपचार सुरु

  मुंबई : गेल्या 24 तासांत मुंबईत 1 हजार 709 नवे कोरोनाचे रुग्ण

  गेल्या 24 तासात 5 जणांचा झाला मृत्यू

  मुंबईत  कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 41 हजार 999 वर

  आतापर्यंत 3 लाख 17 हजार 830 जण कोरोनामुक्त

  मुंबईत आतापर्यंत 11 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  मुंबईत सध्या 11 हजार 747 जणांनावर मुंबईत उपचार सुरु

 • 13 Mar 2021 19:16 PM (IST)

  राज्यात कोरोनाचा स्फोट, दिवसभरात15 हजार 602 नवे रुग्ण, 88 जणांचा मृत्यू

  दिवसभरात कोरोनाचे 15 हजार 602 नवे रुग्ण आढळले आहेत.

  मागील 24 तासांमध्ये राज्यात  88 जणांचा झाला मृत्यू झाला.

  गेल्या 24 तासात राज्यात 7 हजार 467 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

  राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 22 लाख 97 हजार 793 वर पोहोचला  आहे.

  राज्यात आतापर्यंत 21 लाख 25 हजार 211 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

  आतापर्यंत कोरोनामुळे 52 हजार 811 जणांना झाला मृत्यू

  राज्यात सध्या 1 लाख 18 हजार 525 जणांवर उपचार सुरु

 • 13 Mar 2021 19:09 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 1633 कोरोना रुग्णांची वाढ, 13 जणांचा मृत्यू

  पुण्यात दिवसभरात 1633 कोरोना रुग्णांची वाढ

  – दिवसभरात  638 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात दिवसभरात 13 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

  – पुण्यात सध्या 351 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  पुण्यात सध्या 10723 सक्रीय कोरोना रुग्ण

  पुण्यात एकूण 4937 रुग्णांचा मृत्यू

 • 13 Mar 2021 19:06 PM (IST)

  जळगावात पिंपरूड फाट्याजवळ दुचाकीचा अपघात, पिता-पुत्र जागीच ठार

  जळगाव : फैजपूर येथील असलेल्या पिंपरूड फाट्याजवळ दुचाकीचा अपघात

  अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

  पोलिसांकडून धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरु

 • 13 Mar 2021 18:50 PM (IST)

  गावात प्रवेश करताना ट्रॅक्टरला लागली आग, चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे जीवितहानी टळली

  चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सुब्बई येथे ट्रॅक्टरला लागली आग

  ट्रॅक्टरने गावात प्रवेश करत असताना वीज खांबाला दिली धडक

  चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

  विजेच्या तारा तुटून थेट ट्रॅक्टरवर पडल्याने लागली आग

  ऐन गावातच रस्त्यावर हा प्रकार घडल्याने नागरिक आले धावून

  राजुरा अग्निशमन दलाची गाडी तीस किलोमीटर दूरवर असल्याने नागरिकांनीच एकत्र येत विझविली आग

  ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुले प्राणहानी टळली

 • 13 Mar 2021 18:41 PM (IST)

  नागपुरात कोरोनाचा स्फोट, दिवसभरात 2000 नवे कोरोना रुग्ण

  नागपुरात आज पुन्हा कोरोना रुग्णात वाढ

  कोरोना रुग्ण संख्येने पार केला 2000 चा आकडा

  आज नागपुरात 2261 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  तर 1022 जणांनी केली कोरोनावर मात

  कोरोना रुग्णांची एकूण रुग्ण संख्या – 168250

  आतापर्यंत 158380 जण कोरोनामुक्त

  नागपुरात आतापर्यंत 4447 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

 • 13 Mar 2021 18:30 PM (IST)

  यवतमाळमध्ये नवे 346 जण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यत 501 जणांचा मृत्यू

  यवतमाळ : यवतमाळमध्ये आज 346 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात येथे तीन जणांचा मृत्यू झाला.

  तर दिवसभरात यवतमालमध्ये 224 जण कोरोनामुक्त झाले.

  यवतमाळमध्ये सध्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 2477  वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत येथे 501 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • 13 Mar 2021 18:28 PM (IST)

  अमरावती जिल्ह्यात आढळले 383 नवे कोरोना रुग्ण

  अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 383 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तशी माहिती  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे येथे कोरोना रुग्णांचा आकडा42 हजार 114 वर पोहोचला आहे.

 • 13 Mar 2021 18:21 PM (IST)

  इचलकरंजीमध्ये पार्वती इंडस्ट्रीजजवळ ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

  कोल्हापूर : इचलकरंजी येथे पार्वती इंडस्ट्रीजजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात

  मोटारसायकलला चुकविण्याच्या नादात ट्रॅक्टरचा आपघात

  टपरी मालक गजानन नरसाळे ( वय 40 ) गंभीर जखमी

  साखर कारखाने सुरू झाल्यापासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ

  जयसिंगपूर ते इचलकरंजी शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर हा अपघात घडल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत

 • 13 Mar 2021 17:48 PM (IST)

  दक्षिण मुंबईच्या मदनपूर भागात इमारतीचा काही भाग कोसळला, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

  मुंबई : दक्षिण मुंबईच्या मदनपूर भागात एका इमारतीचा काही भाग कोसळला

  अग्निशमन दल आणि पोलिस टीम घटनास्थली

  मिळालेल्या माहितीनुसार इमारतीत कोणीही वास्तव्यास नव्हते.

  परंतु इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली कोणा आहे का याची चाचपणी केली जातेय.

 • 13 Mar 2021 17:24 PM (IST)

  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेंचा जामीन नाही, पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न झाल्याचे कोर्टाचे निरीक्षण

  ठाणे : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेंच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत असल्याने अंतरिम जामीन द्यायला कोर्टाचा नकार

  वाझेंच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत असून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला आहे असल्याचं ठाणे सत्र न्यायालयाचं निरीक्षण

  मनसुख हिरेन यांनी वाझे यांच्यावर आरोप केले होते, त्यामुळे त्याचीही कोर्टाने घेतली दखल

  19 मार्च रोजी जामीन अर्जावर एटीएसचं म्हणणं कोर्ट ऐकून घेणार

  त्यानंतर वाझे यांच्या जामिनावर होणार सुनावणी

 • 13 Mar 2021 16:57 PM (IST)

  बारामतीतील जळोचीतूनअपहरण केलेल्या युवकाची सुखरुप सुटका, दोघांना अटक

  बारामती : जळोचीतून अपहरण केलेला युवक कृष्णराज जाचक याचा शोध लागला

  पाच जणांनी केलं होतं कृष्णराज याचं अपहरण

  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी येथून दोघांना केली अटक

  पाच कोटी रुपयांची केली होती मागणी

  बारामती शहर पोलिसांनी केली कृष्णराज जाचकची सुटका

 • 13 Mar 2021 16:25 PM (IST)

  गडचिरोली  नव्या  38 जणांना कोरोनाची लागण, दिवसभरात 13 जण कोरोनामुक्त

  गडचिरोली  नव्या  38 जणांना कोरोनाची लागण, दिवसभरात 13 जण कोरोनामुक्त

  जिल्हयात आतापर्यंत 9855 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9516 वर पोहचली.

  सध्या गडचिरोली जिह्ल्यात 231 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

  गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के

  सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.34 टक्के तर मृत्यू दर 1.10 टक्क्यांवर

 • 13 Mar 2021 16:21 PM (IST)

  मराठी स्टेटस ठेवले म्हणून बेळगावात तीन मराठी मुलांना अटक

  बेळगाव : मराठी स्टेटस ठेवले म्हणून तीन मराठी मुलांना बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून अटक

  अटक केलेल्या मुलांची नावं निखिल केसरकर, विशाल छप्रे, दिगंबर डेळेकर

  तिन्ही मुलांना ग्रामीण पोलीस ठाण्यात ठवण्यात आले आहे.

  रकीकडे कन्नड रक्षण वेदिलेच्या कार्यकात्यानी पोलिसांसमोर मराठी पाट्यांना काळे फसले तेंव्हा कन्नड कार्यकर्त्यांना पकडे नाही. मात्र, आज मराठी स्टेटस ठेवले म्हणून तीन मराठी मुलांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केले.

 • 13 Mar 2021 15:49 PM (IST)

  नागपुरात पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी निलंबित, भैय्यालाल बैस हत्या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका

  नागपुरातील पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी निलंबित

  भैय्यालाल बैस हत्या प्रकरणात निष्काळजीपणा केल्या प्रकरणी निलंबन

  नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने झाली करवाई

  9 मार्चला भैय्यालाल बैस जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाल्यावरही दखल न घेतल्यानं मृत्यू झाल्याचा ठपका

  त्यामुळं निष्काळजीपणा केल्यानं केले निलंबित

 • 13 Mar 2021 15:25 PM (IST)

  श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण अपहरण आणि हत्या प्रकरण, पाच जणांना अटक

  अहमदनगर : श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण अपहरण आणि हत्या प्रकरण

  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गोतम हिरण यांची हत्या करणाऱ्यांना अखेर जेरबंद करण्यात यश आलंय.

  खंडणीसाठी अपहरण केल्यावर गौतम हिरण यांची हत्या करण्यात आली होती.

  हिरण यांचे अपहरण करुन  आरोपींनी 1 लाख 65 हजार रुपये केले होते लंपास

  1 तारखेला अपहरण केल्यानंतर 7 मार्च रोजी सापडला होता मृतदेह.

  पाच आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात

  नाशिकमधिल चार आणि नगरच्या एकाला अटक

  संदिप हांडे, जुनेद शेख, अजय चव्हाण, नवनाथ निकम आणखी एक 22 वर्षीय आरोपी  ताब्यात

  आत्तापर्यंत एकुण सात आरोपी जेरबंद…

  पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची माहिती

 • 13 Mar 2021 15:08 PM (IST)

  सचिन वाझे यांचं व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस चिंताजनक, यामध्ये गृहमंत्री नक्की लक्ष घालतील- उदय सामंत

  रत्नागिरी – सचिन वाझे यांनी स्टेटसला टाकलेली पोस्ट चिंताजनक

  या प्रकरणात गृहमंत्री नक्की लक्ष घालतील

  शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांची सचिन वाझे प्रकरणात प्रतिक्रिया

  एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना त्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा अशी मागणी करणं चुकीचं

  सचिन वाझे यांना कुणीच पाठिशी घालत नाहीये- उदय सामंत

  रिफायनरी प्रकल्प जडगड किंवा रायगडला जातोय का या संदर्भात मला माहिती नाही

  रिफायनरीची जागा फायनल झाल्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल- उदय सामंत

 • 13 Mar 2021 14:58 PM (IST)

  सचिन वाझेंची ती पोस्ट चिंताजनक, गृहमंत्री नक्की लक्ष घालतील : उदय सामंत

  रत्नागिरी- सचिन वाझे यांनी स्टेटसला क्रिएट केलेली पोस्ट चिंताजनक या प्रकरणात गृहमंत्री नक्की लक्ष घालतील, शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांची प्रतिक्रिया एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना त्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा अशी मागणी करणं चुकीचं सचिन वाझे यांना कुणीच पाठीशी घालत नसल्याची उदय सामंत यांची माहिती रिफायनरी प्रकल्प जडगड किंवा रायगडला जाते या संदर्भात मला माहिती नाही रिफायनरीची जागा फायनल झाल्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल- उदय सामंत

 • 13 Mar 2021 14:58 PM (IST)

  हत्या प्रकरणात निष्काळजीपणा, नागपुरात पोलीस उप निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी निलंबित

  नागपूर :

  नागपुरातील पोलीस उप निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी निलंबित,

  भैय्यालाल बैस हत्या प्रकरणात निष्काळजीपणा केल्या प्रकरणी निलंबन,

  नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने झाली करवाई,

  9 मार्च ला भैय्यालाल बैस जखमी अवस्थेत असल्याची याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाल्यावरही दखल न घेतल्यानं मृत्यु झाला,

  त्यामुळं निष्काळजीपणा केल्यानं केले निलंबित

 • 13 Mar 2021 14:45 PM (IST)

  नांदगांव तालुक्याची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल, गेल्या 24 तासात 97 बाधित

  मनमाड : नांदगांव तालुक्याची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल..

  – मागील 24 तासांत आले 97 रुग्ण कोरोना संसर्गबाधित..

  – नांदगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 200 पार..रुग्णसंख्या 2 हजार 732 वर

  – तर कोरोना संसर्गाने मागील तीन दिवसांत तिघांचा मृत्यू..

  – रुग्णसंख्या वाढल्याने अनेक जिल्हे चिंतेत

  – मनमाडमध्ये नव्याने डि.सी.एच.सी, सी.सी.सी सेंटर उभारणे गरजेचे..

  – अजूनही दीडशेहून अधिक अहवाल प्रलंबित.

  – नागरिकांनो काळजी घ्या ; दिलेल्या सूचनांचे पालन करा प्रशासनाचे आवाह

 • 13 Mar 2021 14:11 PM (IST)

  बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू,

  बीड: बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू

  सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत जिल्हा बंद

  अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय बंद

  जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आदेश

 • 13 Mar 2021 13:10 PM (IST)

  महाराष्ट्र कर्नाटक चेकपोस्टवर शिवसैनिकांचे आंदोलन

  कोल्हापूर : महाराष्ट्र बसवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन

  कागल जवळ महाराष्ट्र कर्नाटक चेकपोस्टवर शिवसैनिक आले एकत्र

  मराठी भाषिकांवर सुरू असलेल्या दडपशाहीचा निषेध

  कर्नाटक कडून येणाऱ्या गाड्यांवर जय महाराष्ट्रचे फलक लावणार शिवसैनिक

 • 13 Mar 2021 13:09 PM (IST)

  जनावरांचा चारा वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग

  पुणे : जनावरांचा चारा वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग

  -हा ट्रक रस्त्यावरून जात असताना विद्युत वाहिन्यांच्या तारांना घर्षण झाल्याने हि आग लागली

  -जनावरांच्या चा-यासह ट्रक आगीच्या भस्मस्थानी.

  -सुदैवाने कुठली जीवित हानी नाही मात्र मोठे आर्थिक नुकसान

  -खेड तालुक्यातील शिरोली येथील घटना

  -राजगुरूनगर नगरपरिषदेच्या आग्निशामक दल घटनास्थळी दाखल.

 • 13 Mar 2021 13:05 PM (IST)

  नागपुरातील लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

  नागपूर  – नागपुरातील लावण्यात आलेल्या लॉकडाऊन ला व्यापाऱ्यांचा विरोध

  नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स च्या प्रतिनिधी नी दिल पालक मंत्री नितीन राऊत यांना निवेदन

  लॉकडाऊन हा पर्याय नाही ,लॉकडाऊन मुळे व्यापारी आधीच संकटात आले

  त्यामुळे लॉकडाऊन न करता मार्ग काढा

  अशी मागणी व्यापारी करत आहे

 • 13 Mar 2021 11:09 AM (IST)

  नागपुरातील विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

  नागपुरात आज आणि उद्याला विकेंड लॉकडाऊन

  मात्र विकेंड लॉकडाऊन ला संमिश्र प्रतिसाद

  बाजारपेठा बंद मात्र नागरिक रस्त्यावर

  सोमवार 15 मार्च पासून 21मार्च पर्यंत लागणार कडक लॉकडाऊन

 • 13 Mar 2021 11:07 AM (IST)

  सातारा जिल्हयात 75 हजार जणांना आतापर्यंत कोरोनाचे लसीकरण

  सातारा जिल्हयात 75 हजार जणांना आतापर्यंत कोरोनाचे लसीकरण

  94 शासकीय आणि 19 खासगी रुग्णालयात कोरोनाचे दिले डोस

  आरोग्य विभागाची माहिती

 • 13 Mar 2021 11:07 AM (IST)

  ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतरिम जामीन तात्पुरता फेटाळला

  ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतरिम जामीन तात्पुरता फेटाळला

  पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे..

  ठाणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज वाझे यांनी केला होता

 • 13 Mar 2021 11:06 AM (IST)

  नागपुरात वाढता कोरोनाचा प्रभाव बघता पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये

  नागपुरात वाढता कोरोनाचा प्रभाव बघता पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये

  पोलिसांनी सुरू केली मास्क आणि चालणं कारवाई

  बाहेरून येणाऱ्या वाहनांची केली जात आहे तपासणी

  चार चाकी वाहनात सोशल डिस्टनसिंग च पालन न करणारे आणि मास्क न घालणाऱ्या न वर कारवाई

  नागपूर च्या अनेक चौकात कारवाई सुरू

 • 13 Mar 2021 11:05 AM (IST)

  पुणे एमपीएससी नियुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी नाकारली

  पुणे –

  एमपीएससी नियुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी नाकारली

  पत्रकार भवनाच्या बाहेर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात

  11 जून 2020 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागूनही अद्याप नियुक्त्या नाहीत

  विद्यार्थी आज करणार होते आंदोलन, मात्र पोलीसांनी परवानगी नाकारली

 • 13 Mar 2021 09:03 AM (IST)

  नागपुरात लॉकडाऊनच्या आधी होत असलेली गर्दी चिंता वाढविणारी

  नागपूर –

  नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली

  मात्र लॉकडाऊनच्या आधी होत असलेली गर्दी चिंता वाढविणारी आहे

  काल दिवस भर वेगवेगळ्या बाजारपेठा अक्षरशः गर्दीने फुलून निघाल्या होत्या

  सीताबर्डी, इतवारी, महाल या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती

  तर रस्त्यावर सुद्धा दिवसभर गर्दी होती

  त्यामुळे एकीकडे नागरिक नियमांचं उल्लंघन करून कोरोनाला आमंत्रण देत आहे मात्र प्रशासनाची चिंता वाढली आहे

 • 13 Mar 2021 09:02 AM (IST)

  28 मार्च पासून नाशिक-कोलकाता आणि नाशिक- सुरत विमानसेवा

  नाशिक –

  28 मार्च पासून नाशिक-कोलकाता आणि नाशिक- सुरत विमानसेवा

  गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 70 टक्के विमान प्रवासी वाढले

  नाशिकहून गोवा आणि इंदोर साठी देखील विमानसेवा प्रस्तावित

  येत्या काही दिवसात प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज

 • 13 Mar 2021 08:59 AM (IST)

  नाशकात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा

  नाशिक –

  कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा

  महापालिकेची दीड लाख डोसची मागणी

  महापालिका केंद्रासह शहरात खाजगी ठिकाणी देखील तुटवडा

  महापालिकेने आतापर्यंत दिल्या 50,700 लस

  लस लवकरच पोहोचेल असा पालिका प्रशासनाचा दावा

  मात्र नागरिकांचा प्रतिसाद असताना लसीचा पुरवठा तात्काळ व्हावा अशी मागणी

 • 13 Mar 2021 08:59 AM (IST)

  नागपूर विभागासाठी काल पोहचल्या 3 लाख 93 हजार डोस

  नागपूर :

  नागपूर विभागासाठी काल पोहचल्या 3 लाख 93 हजार डोस

  यात नागपुर साठी पावणे दोन लाख कोरोना प्रतिबंधात्मक लस पोहचल्या

  2 लाख 76 हजार कोव्हीशिल्ड तर 1 लाख 17 हजार हजार 760 कोव्हाक्सिन चा समावेश

  आता लसी चा तुटवडा नाही

  लसीकरण ला मिळणार गती

 • 13 Mar 2021 08:58 AM (IST)

  पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांनी कोरोनाची लस घेतली

  पिंपरी चिंचवड

  पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांनी कोरोनाची घेतली लस

  सांगवी येथील लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड लस महापौरांनी टोचून घेतली

  लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाला नाही त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन महापौरांनी शहरवासीयांना केले

 • 13 Mar 2021 08:55 AM (IST)

  येवल्यात कोरोनाबाधित 17 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

  येवला :

  कोरोनाबाधित १७ रुग्णांच्या अहवाल पॉझिटिव्ह

  आता पर्यंत ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  येवल्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली १३७१

  कोरोनावर १२२३ जणांनी मात करत केली घरवापसी

  उर्वरित ९४ जण कोरोणा उपचार घेत आहे

 • 13 Mar 2021 08:53 AM (IST)

  शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांचा साखर कारखाना जप्तीचे आदेश

  औरंगाबाद :

  शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांचा साखर कारखाना जप्तीचे आदेश

  पैठण तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश

  साखर आयुक्तांनी काढले कारखाना जप्त करण्याचे आदेश

  शेतकऱ्यांची उसाची देणी थकल्यामुळे काढले जप्तीचे आदेश

  17 कोटी 49 लाख रुपयांची थकली शेतकऱ्यांची देणी

  औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना काढले कारखाना जप्तीचे आदेश

  कारखाना जप्त करून शेतकऱ्यांची देणी देण्याचा आदेश

  मात्र थकीत रक्कम भरल्याचं मंत्री संदीपान भुमरे यांचं स्पष्टीकरण

 • 13 Mar 2021 08:42 AM (IST)

  औरंगाबादेत कोरोना लस घेतल्यानंतरही तब्बल 21 जण पॉझिटिव्ह

  औरंगाबाद :

  कोरोना लस घेतल्यानंतरही तब्बल 21 जण आले पॉझिटिव्ह

  आरोग्य अधिकारी मेघा जोगदंड यांनी दिली माहिती

  औरंगाबाद शहरातील धक्कादायक प्रकार

  आतापर्यंत 46 हजार जणांना देण्यात आली कोरोनाची लस

  तर तब्बल 21 जणांना लस दिल्यानंतर झाला कोरोना

  लस दिल्यानंतर कोरोना होणाऱ्यात डॉक्टरांचे प्रमाण सर्वाधिक

  लसीकरणांतर कोरोना होत असल्यामुळे वाढली चिंता

 • 13 Mar 2021 07:57 AM (IST)

  नागपुरात आज आणि उद्या विकेंड लॉकडाऊन

  नागपूर –

  नागपुरात आज आणि उद्या विकेंड लॉकडाऊन

  तर सोमवार 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत कडक लॉक डाऊन

  मात्र लॉक डाऊन ची खरी सुरवात आज पासूनच होणार

  नागपुरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे रुग्ण संख्या

  गेल्या 24 तासात 1957 नवीन रुग्ण आढळून आले तर 15 जणांना जीव गमवावा लागला

  मात्र नागरिक आता तरी याला गांभीर्याने घेईल का ..?

 • 13 Mar 2021 07:53 AM (IST)

  महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक, एसटीची वाहतूक बंद

  कोल्हापूर

  महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला

  दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद

  अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक

  कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना

  दरम्यान, खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक केली बंद

  शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात शिवसेनेच्या वाहनांवर केला होता हल्ला

  त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात काल शिवसेनेने कर्नाटक बस रोखली होती

 • 13 Mar 2021 07:13 AM (IST)

  नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन अटळ, जिल्हाधिकाऱ्यांची नाशिककरांना ‘लास्ट वॉर्निंग’

  नाशिक –

  जिल्हाधिकाऱ्यांची नाशिककरांना ‘ लास्ट वॉर्निंग ‘

  नियम पाळले नाहीत तर लॉक डाऊन अटळ

  निर्बंध पाळण्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचं आवाहन

  आज आणि उद्या शहर आणि जिल्ह्यात कठोर निर्बंध

  दुकानं, बाजारपेठा, धार्मिक स्थळं, आस्थापनां राहणार बंद

  हॉटेल, बार मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

  नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई देखील आणखी कठोर होणार

 • 13 Mar 2021 07:11 AM (IST)

  कंटेन्मेंट झोन फक्त कागदावर नकोत, निर्बंध काटेकोर हवेत, सीताराम कुंटे यांच्या प्रशासनाला सूचना

  नाशिक –

  मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची कानउघडणी

  कंटेन्मेंट झोन फक्त कागदावर नकोत, निर्बंध काटेकोर हवेत

  सीताराम कुंटे यांच्या प्रशासनाला सूचना

  नाशिक, धुळे, नांदुरबर, नगर म्शस परिस्थिती बिघडण्याची शक्यता

  नागरिक नियम पाळत नसतील, तर कठोर कारवाई करा

  सीताराम कुंटे यांचे प्रशासनाला आदेश

 • 13 Mar 2021 07:01 AM (IST)

  औरंगाबादेत आज पुन्हा 617 कोरोना रुग्णांची वाढ

  औरंगाबादेत आज पुन्हा 617 कोरोना रुग्णांची वाढ

  रुग्णांचा आकडा पोचला 55958 वर

  रुग्णालयात 4464 रुग्णांवर उपचार सुरू

  तर आजपर्यंत 1326 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

  तर 50168 रुग्णांना आजपर्यंत देण्यात आला डिस्चार्ज

 • 13 Mar 2021 07:01 AM (IST)

  आजपासून दोन दिवस औरंगाबादेत कडक लॉकडाऊन

  औरंगाबाद :

  आजपासून दोन दिवस औरंगाबादेत कडक लॉकडाऊन

  शनिवार आणि रविवार दोन दिवस असणार कडक लॉक डाऊन

  जीवनावश्यक वस्तू आणि एमआयडीसी वगळता सर्वकाही राहणार बंद

  लॉक डाऊनच्या अंमलबजावणीसाठी शेकडो पोलीस शहरात तैनात

  कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाचे कठोर पाऊल

 • 13 Mar 2021 06:32 AM (IST)

  मीरा-भाईंदरमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली, हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन

  मीरा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामधील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये 31 मार्च 2021 मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत लॉकडाऊन राहतील, तसेच, कोरोना विषाणू उपाययोजना करण्याचा दृष्टीने मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट क्षेत्र आणि कंटेंटमेंट झोन बाहेरील सर्व हॉटल्स, रेस्टॉरंट, रेस्टॉरंट आणि बार , बँकवेट हॉल आणि फूड कोर्ट इत्यादी तत्सम ठिकाण्याच्या सेवा 50% क्षमतेसह व मॉलसहित सर्व प्रकारची दुकाने रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती मीरा भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली

Published On - 4:44 pm, Sun, 14 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI