Maharashtra News Live Update : शिवेसनेच्या बड्या नेत्यांचा अयोध्या दौरा, काही दिवसातच आदित्य ठाकरेंही अयोध्येत

| Updated on: Jun 05, 2022 | 10:49 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : शिवेसनेच्या बड्या नेत्यांचा अयोध्या दौरा, काही दिवसातच आदित्य ठाकरेंही अयोध्येत
मोठी बातमी
Follow us on

मुंबई : आज रविवार 5 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आज देशभरात विविध केंद्रावर युपीएससी पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही परीक्षा दोन सत्राात होणार आहे. पुर्ण तयारी करूनच पेपरला येण्याचं युपीएससीकडून विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. सकाळी 9.30 वाजता होणार पहिल्या पेपरला सुरुवात होईल. गट अ पदांसाठी युपीएससीची परीक्षा होत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jun 2022 07:33 PM (IST)

    मानोरा, रिसोड शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

    वाशिम च्या मानोरा, रिसोड शहरासह अनेक ठिकाणी आज सायंकाळ दरम्यान वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात जर मृग नक्षत्राचा चांगला पाऊस पडला तर 15 जूनपर्यंत अनेक ठिकाणी खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात होईल.

  • 05 Jun 2022 07:32 PM (IST)

    कराड तालुक्यात अनेक ठिकाणी मान्सून पुर्व हलक्या पावसाची हजेरी

    मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

    पेरणीपूर्वी मशागतीसाठी उपयुक्त पाउस


  • 05 Jun 2022 06:34 PM (IST)

    कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले आहे त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही-इंदुरीकर महाराज

    जळगावात गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराज यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंदुरीकर महाराजांनी सांगितले की कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले आहे त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही.तर आपल्या कडे परिस्थिती वेगळी आहे जो कष्ट करतो त्याला पगार कमी बुद्धी चेक करून पगार दिला पाहिजे,सर्व वारकरी एकत्र आले तर देश बदलू शकतात,विज्ञाना बरोबर अध्यात्म द्या पुढची पिढी घडेल अशा विविध विषयांवर किर्तन करीत इंदुरीकर महाराजयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  • 05 Jun 2022 04:54 PM (IST)

    राज्यसभेसाठी शिवसेनेच्या हलचाली वाढल्या

    शिवसेनेचे शिष्टमंडळ हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला विरार मध्ये दाखल

  • 05 Jun 2022 04:27 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत अयोध्या दौऱ्यावर

    मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊत करणार पाहणी

    उद्या सकाळी संजय राऊत अयोध्येत दाखल होणार

    नदीकाठावर आदित्य ठाकरे महाआरती करणार

     

  • 05 Jun 2022 04:26 PM (IST)

    पुण्यात चोरांचा सुळसुळाट

    जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाची शाखा मध्यरात्री चोरांनी फोडली आहे

    या सोबत स्टार हेल्थ विमा कंपनीचे ऑफिस व अजून एक खाजगी ऑफिस सुद्धा चोरट्यानी फोडले आहे.

  • 05 Jun 2022 04:25 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्हा प्रशासनची भूमाफियावर मोठी कारवाई

    वक्फ बोर्डाची 8 हजार 670 हेक्टर जमिनीवरील नोंदी रद्द करण्याचे पत्र

    उस्मानाबाद जिल्ह्यातील दर्गाह , देवस्थान इनाम व वतन जमिनीची जवळपास 22 हजार एकर जमीन वर्ग 2 करित सात बारा दुरुस्ती

    जमीन वर्ग 2 केल्याने जमिनीची खरेदी विक्री करता येणार नाही त्यामुळे मालमत्ता धारक यांच्यात खळबळ

    इमानी , देवस्थान जमिनीचे सात बारा दुरुस्ती करण्याची महसूल विभागची मोहीम

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महसूली नोंदी दुरुस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाई

    शासनाने दिलेल्या जमिनी चुकीच्या पद्धतीने सात बारावर नोंदी घेत केला अकृषी गैरवापर व प्लॉटिंग

    परवानगी न घेता व नजराणा रक्कम न भरता अनेक सात बारे उताऱ्यावर अनधिकृत नोंदी व खरेदी विक्री

    भूमाफिया व काही तत्कालीन अधिकारी यांनी संगनमताने पैसे न भरता विनपरवानगी वर्ग 2 च्या इनामी जमिनी वर्ग 1 केल्या

    तुळजाभवानी देवस्थानसह हजरा खाजा शमशोद्दीन गाजी दर्गाह इनामी जमिनीचा समावेश

  • 05 Jun 2022 02:35 PM (IST)

    पदाधिकारी पवारांचे ऐकत नाहीत का ? – आनंद दवे

    – या राष्ट्रवादीच करायचं काय..

    -पदाधिकारी पवारांचे ऐकत नाहीत का ?

    – आम्ही जातीयवादी नाही, आम्ही सकारात्मक राजकारण करतो असं पवार साहेबांनी पुण्यात परवा आम्ही न गेलेल्या ब्राह्मण बैठकीत सांगितलं तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत असं पण सर्वां समोर मीडिया ला सांगितलं

    – ब्राह्मण महासंघला खात्री होती की राष्ट्रवादी जातीय राजकारण सोडणार नाही म्हणूनच आम्ही ती भेट नाकारली होती

    – काल पुण्यात जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा पक्षाचे संस्कार दाखवले आणि स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वर टीका केली

    यांना ना बाबासाहेब पुरंदरे यांचं पत्र मान्य आहे ना oxford च, ना यांना जेम्स लेन चे स्पष्टीकरण मान्य आहे ना खरा इतिहास

    यांना हवं आहे फक्त जातीय तेढ आणि द्वेषच राजकारण

  • 05 Jun 2022 02:34 PM (IST)

    तिथली परिस्थिती बघता फार मोठं देशाच्या सुरक्षेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय

    तिथली परिस्थिती बघता फार मोठं देशाच्या सुरक्षेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , अजित पवार, बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात

    विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडीतांच्या मुलांना जर राज्यात शिक्षण घ्यायचं असेल तर मी योग्य तो न्याय देईन

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांच मोठं वक्तव्य नितेश राणेंना टोला

    महाविद्यालय सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे

    22 तारखेला सीईटी आहे

    कोरोनामुळं शैक्षणिक वर्ष पुढं जाईल

    मात्र पुढच्या वर्षी वेळेत महाविद्यालय सुरू केले जातील

    10 तारखेला निवडणूक आहे मतमोजणी होईल तेव्हा महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील

    यामध्ये चिंता करण्याची गरज नाही

    राज्यसभेच्या चारही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील

    देवेंद्र फडणवीसांना कोणता आत्मविश्वास हे त्यांना विचारायला हवं मात्र आम्हाला आत्मविश्वास आहे की आमचे उमेदवार विजयी होतील

    महाविकास आघाडीचे आमदार दाखवून मतदान करतील गोपनीय मतदान नाही

    सभा कशी घ्यायची असते हे आम्ही दाखवून देऊ

    कोणाच्या आरोपांवर उत्तर द्यावं अशी त्यांची इमेज नाही

    मुंबईची अतिविराट झाली तशी

    सभेचा इतिहास म्हणून ज्वलंत असेल

    विरोध करतायेत ते कोण बोलतायेत

    पाच वर्ष सत्तेत असताना नामकरण का केलं नाही

    उदय सामंत यांची भाजपवर टिकास्त्र

  • 05 Jun 2022 01:24 PM (IST)

    सोमैय्या यांना कांदा देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    नाशिक – सोमैय्या यांना कांदा देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    कांद्याचा प्रश्न सुटत नसल्याचा निषेध करण्यासाठी घेणार होता सोमैय्या यांची भेट

    मात्र भेट देण्यापूर्वी पोलिसांनी घेतलं ताब्यात

    रोहित महाजन अस तरुणाचे नाव

  • 05 Jun 2022 01:03 PM (IST)

    विकासाच्या आड कुणी येणार नाही – मुख्यमंत्री

    विकासाच्या आड कुणी येणार नाही

    प्रत्येकवेळी मी काय बोलू…

    आपल्या मोठे रस्ते….पाहिजेत…

    आपल्याला काम करायचं आहे. माझ्याकडे पूर्वी रस्ता नव्हता

    मातोश्रीमध्ये राहायला गेल्यानंतर चाहूबाजूने खडी होती

    गच्चीतून कळसूबाई पाहत होतो

  • 05 Jun 2022 12:12 PM (IST)

    आमदारांना घोडे म्हणण्याचं काम गाढवच करू शकत – किरीट सोमय्या

    – सामनाचे संपादक आणि पोलीस महासंचालक यांना विनंति आहे, की आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू
    – उद्धव ठाकरेंकडून माहिती घेऊन बाजार मंडणाऱ्यांवर कारवाई करावी
    – मुख्यमंत्री यांची जवाबदारी की त्यांच्या वर्तमान पत्रात आलेली माहिती त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस याना का दिली नाही
    – मुख्यमंत्रीचं स्टेटमेंट घ्यावं, सामना च्या संपादकांचे स्टेटमेंट घ्यावे आणि कारवाई करावी
    – आमदारांना घोडे म्हणण्याचं काम गाढवच करू शकत
    – बेईमान कोण सेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते बेईमान
    – भाजप अशा भ्रष्टाचारावर चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे
    – हे जर खोट असेल तर खोटं बोलणाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे

    – सचिन वाझे ला सीबीआय ने माफीचा साक्षिदार होण्यास मंजुरी दिली आहे
    – सचिन वाझे बोलू लागले तर उद्धव ठाकरेंना भीती वाटते ‘मेरा क्या होगा’
    – तेरा क्या होगा कालिया, जर वाझेनी सांगितलं की दापोली च्या रिसॉर्ट चे पैसे कोणी दिले

  • 05 Jun 2022 11:29 AM (IST)

    बांग्लादेशात कंटेनर डेपोत आग, 22 जणांचा मृत्यू, 450 हून अधिक जखमी

    बांग्लादेशात कंटेनर डेपोत आग, २२ जणांचा मृत्यू, ४५० हून अधिक जखमी
    ढाका- दक्षिण पूर्व बांग्लादेशमध्ये एका खासगी कंटेनर डेपोमध्ये शनिवारी रात्री स्फोट झाला. यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. चाटगाव परिसरात सीताकुंड उपजिल्ह्यात कदमरासुलमध्ये असलेल्या बीएम कंटेनर डेपोत शनिवारी रात्री आग लागल्याने ही दुर्घटना घडाल्याची माहिती आहे.

  • 05 Jun 2022 10:52 AM (IST)

    शिवसेना नेते आणि माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात

    – शिवसेना नेते आणि माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात

    – सावंतांच मतदारसंघ भूम – परंड्याहुन पुण्याकडे परतत असताना पुणे – सोलापूर महामार्गवरील वरवंड येथे झाला अपघात

    – सुदैवाने तानाजी सावंत साहिसलामत

    – फक्त गाडीच झालं किरकोळ नुकसान

  • 05 Jun 2022 10:16 AM (IST)

    अकरा भाजपच्या महिला कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल हेण्याची शक्यता

    दिपाली सय्यद यांनी भाजपा महिला मोर्चाच्या अकरा महिलां विरूद्ध केली ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल.

    1) दिव्या ढोले
    2) मनिषा जैन
    3)वर्षा डहाळे
    4)रीदा रशिद
    5)कविता देशमुख
    6) प्रिया के शर्मा
    7) रिटा मखवाना
    8) मंजु वैष्णव
    9) दिपाली मोकाशी
    10)प्रणीता देवरे
    11)नयना वसानी
    लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता!

  • 05 Jun 2022 10:14 AM (IST)

    ‘संभाजीनगर’ असं नामांतर केल्यास स्वागत करू-भागवत कराड

    मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर केल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू

    मात्र विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना सुप्रीम कोर्टाने संभाजीनगर नाव फेटाळल होत

    भाजप नेते भागवत कराड यांची शिवसेनेवर टीका

    तर पुन्हा महानगरपालिका, जिल्हा परिषद मधून संभाजीनगरचा ठराव घ्यावा लागेल

    तो विधिमंडळात मंजुर करावा लागेल नंतर तो केंद्राकडे पाठवावा लागेल

    बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर ठेवलं होतं

    ते करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे चिरंजीव यांनी ठराव घेऊन घोषिक करावं

  • 05 Jun 2022 09:57 AM (IST)

    काश्मिरी पंडितांवरील हल्ले पंतप्रधानांचं अपयश- राऊत

    संजय राऊतांचा आज अयोध्या दौरा

    काश्मिरी पंडितांवरील हल्ले पंतप्रधानांचे अपयश

    काश्मिरी पंडितांचं पलायन आणि  हत्या का, यावर मुख्यमंत्र्यांनी काल संवेदना व्यक्त केल्या-राऊत

    काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य ते करणार-राऊत

    1990 साली भाजप सत्तेत होता, तेव्हा पंडितांचं पलायन झालं होतं, आजही तिच स्थिती आहे, आता बोला

    आठ वर्ष झाले पंडितांचं पलायन सुरू आहे

  • 05 Jun 2022 09:55 AM (IST)

    ट्रक चालकाचे हातपाय बांधून शेतात फेकला अन् स्टीलने भरलेला ट्रक पळविला

    जालन्याहून सांगलीकडे 13 टन स्टील घेऊन जाणाऱ्या ट्रकला रस्त्यात अडवत ट्रक पळवून नेल्याची घटना समोर आलीय. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी शिवारात ही घटना घडलीय. प्रवीण सरगर हा ट्रक ड्रायव्हर स्टीलने भरलेला ट्रक घेऊन जात होता. त्यावेळी अज्ञात 6 चोरट्यांनी तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत ट्रक ड्रायव्हरचे हातपाय बांधून आष्टी शिवरातील उसाच्या फडात फेकून देत ट्रक पळविल्याचा प्रकार घडलाय. याबाबत अज्ञात 6 जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी यातून एकूण 13 लाख 61 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या चोरट्यांच्या मागावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची तीन पथक असल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी दिलीय.

  • 05 Jun 2022 09:53 AM (IST)

    न विचारतां व्हॉट्सअप ग्रुपमध्ये add केलं, तरुणावर प्राणघातक हल्ला

    न विचारतां व्हॉट्सअप ग्रुपमध्ये add केलं म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

    नाशिकच्या विजय नगर परिसरातील घटना

    न विचारता ग्रुप मध्ये का add केले म्हणत दोघा तरुणांनी कोयत्याने केला प्राणघातक हल्ला

    हल्ल्यात दीपक डावरे हा तरुण गंभीर जखमी

    डावरे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

    पोलिसांनी दोन अल्पवयीन युवकांना घेतले ताब्यात

  • 05 Jun 2022 09:36 AM (IST)

    कृष्णा नदीवरील 89 वर्षाचा ऐतिहासिक बंधारा पाटबंधारे विभागाच्या वतीने पाडण्यात येण्याचा येत असल्याचा आरोप

    कृष्णा नदीवरील 89 वर्षाचा ऐतिहासिक बंधारा पाटबंधारे विभागाच्या वतीने पाडण्यात येण्याचा येत असल्याचा आरोप करत पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सर्व सांगलीकरांनी एकत्र या आणि चला बंधारा वाचवू या असे म्हणत लोकांनी आज सांगलीच्या कृष्णा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर मानवी साखळी करून शासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे या आंदोलनामध्ये सर्व सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यासंदर्भात पैलवान पृथ्वीराज पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे

  • 05 Jun 2022 09:36 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात देशी दारू वर पोलिसांची मोठी कारवाई

    गडचिरोली जिल्ह्यात देशी दारू वर पोलिसांची मोठी कारवाई

    जवळपास दहा लाखाची देशी दारूचा साठा उध्वस्त केला गडचिरोली पोलिसांनी

    सिरोंचा तालुक्यातील पोचंमपल्ली येथे जंगलात तयार होत होती देशी दारू

    गुड व साखर मध्ये युरिया मिक्स करून तयार केली जाते ही दारू

  • 05 Jun 2022 08:04 AM (IST)

    पुणे-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस आता धावणार वीजेवर

    पुणे कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस आता धावणार वीजेवर

    315 किमीचा मार्ग वीजेवर करणार पार

    पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गावरचं विद्युतीकरणाचं काम पुर्ण

    आज प्रायोगिक तत्त्वावर धावणार पुणे ते कोल्हापूर रेल्वे

    जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेनं घेतला निर्णय

    2019 पासून विद्युतीकरणाचं काम सुरू होतं अखेर ते पुर्ण झालंय

  • 05 Jun 2022 07:59 AM (IST)

    ताप सदृष्य लक्षणे दिसल्यास त्वरीत लक्ष द्या, मुंबई महापालिकेचं नागरीकांना आवाहन…

    ब्रेक – तापसदृष्य लक्षणे दिसल्यास त्वरीत लक्ष द्या, मुंबई मनपाचं नागरीकांना आवाहन…

    – देशात मान्सूनचं आगमन झालंय. काही दिवसातच राज्यातही पाऊस सुरू होईल. पावसाळ्यात खोकला, सर्दी, ताप यासारखे आजार पसरतात, शरीरात आळस आणि विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

    स्वच्छतेची विशेष काळजी घ्या तसेच ताप किंवा आळस असल्यास ताबडतोब सक्रिय व्हा. असं आवाहन…

    -, व्हायरल ताप आणि कोरोनाची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

    परिणामी पावसाळ्यात सावधगिरी बाळगावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

  • 05 Jun 2022 07:57 AM (IST)

    दीड वर्षाच्या मुलाने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केल्यामुळे गोंधळ उडाला

    दीड वर्षाच्या मुलाने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केल्यामुळे गोंधळ उडाला

    आई एका मुलाला बाथरूममध्ये स्नान घालत असतालाना दीड वर्षाच्या मुलाने बाथरूमचा दरवाजा बंद केला

    चिमुरड्याने दरवाजा बंद केल्याने बराच वेळ लहान मुलगा आत अडकून बसला होता,

    शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीद्वारे खिडकी तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करून सुटका केली.

  • 05 Jun 2022 06:57 AM (IST)

    जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांसाठी खुश खबर

    नागपूर ब्रेकिंग

    जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांन साठी खुश खबर

    या वर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार नवीन गणवेश आणि पुस्तक

    संपूर्ण शिक्षा अभियान अंतर्गत उपक्रम ,

    शाळा प्रशासन झाले सज्ज

    विध्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार

    1ली ते आठवी च्या विध्यार्थ्यांना मिळणार याचा फायदा

  • 05 Jun 2022 06:55 AM (IST)

    मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’द्वारे केवळ कर्जाची रक्कम मंजूर करून नंतर कर्जवसुलीसाठी धमकावल्याचा प्रकार मालाड येथे घडला आहे.

    मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’द्वारे केवळ कर्जाची रक्कम मंजूर करून नंतर कर्जवसुलीसाठी धमकावल्याचा प्रकार मालाड येथे घडला आहे.

    विशेष म्हणजे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तक्रारदाराचे अश्लील छायाचित्र तयार करून आरोपींनी त्याची बदनामी केली.

    याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • 05 Jun 2022 06:55 AM (IST)

    संविधान पठण कार्यक्रमाचे आयोजन.

    संविधान पठण कार्यक्रमाचे आयोजन.

    भिम आर्मीच्या व आजाद समाज पार्टी च्या सर्व क्रांतीसाथींना मानाचा क्रांतीकारी  जयभीम.

    मित्रांनो आजचे राजकीय वातावरण हे गढूळ केले जात आहे.  वेगवेगळ्या जातीधर्म व समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य, काही पक्ष-पार्ट्याचे नेते यांचे तर्फे केले जात आहे. व तरुण पिढीची दिशाभूल केली जात आहे. त्यांची माथी भडकावली जात आहेत.

    याच कारणाने भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव मा. अशोकजी कांबळे यांनी, महाराष्ट्रभर संविधान पठण, प्रथम पानावरील पतिज्ञा, तसेच भारत माझा देश आहे. ही प्रतिज्ञा. याचे चाळ,चौक, नाका, अशा ठिकाणी या पठाण कार्यक्रम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    याची सुरुवात म्हणून दिनांक रविवार दिनांक ५/६/२२ रोजी  सायंकाळी 4:40 वाजता शिवाजी पार्क मैदान मुख्य द्वार, आदरणीय मीनासाहेब ठाकरे यांच्या मूर्तीच्या समोर, दादर पश्चिम, मुंबई या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे.

    मुंबईतील सर्व भीम आर्मी, तसेच आजाद समाज पार्टी च्या सर्व पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे अशा सर्वाना सूचना.

  • 05 Jun 2022 06:54 AM (IST)

    किरीट सोमय्या आज एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर

    किरीट सोमय्या आज एक दिवसीय नाशिक दौर्या… सकाळी ७ पासून दौर्याला सुरवात…

    – ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी किरीट सोमय्या पुन्हा ऐक्शन मोडमध्ये…

    – १२.३० वाजता नाशकात घेणार पत्रकार परिषद…

    – कार्यकर्ता मेळावा आणि कांदा परिषदेलाही लावणार हजेरी …