Devendra Fadnavis : महाराष्ट्रात DJ चा दणदणाट तर बंद होणारचं, पण कसा? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लान

Devendra Fadnavis : "आज पुण्यात दोन महत्वपूर्ण कार्यक्रमाकरता आलो. मॅग्नम जगातील 100 वर्ष जुनी आईस्क्रिम कंपनी आहे. त्याचं अतिशय आधुनिक ग्लोबल कॅपबलिटी सेंटर पुण्यात सुरु झालय. पुण्यातून जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये कंट्रोल, व्यवस्थापन ते करणार आहेत" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात DJ चा दणदणाट तर बंद होणारचं, पण कसा? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लान
cm Devendra Fadnavis
| Updated on: Sep 04, 2026 | 2:35 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना मीडियाने विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीबद्दल विचारलं. “पहिल्यांदा म्हणजे झालेल्या घटनेचा मी निषेध केला आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. वेगवेगळे विचार असू शकतात. काही या बाजूचे, काही त्या बाजूचे लोक असू शकतात. पण हिंसाचार योग्य नाही. प्रत्येकाने आपपाला मुद्दा मांडला पाहिजे” असं मुख्यमंत्री म्हणाले. “मला असं वाटतं की, एखादा सण आणि उत्सव आपण साजरा करतो, त्यावेळी तो जास्तीत जास्त पारंपारिक पद्धतीने साजरा करता आला तर त्याचा महत्व अधिक असतं. पण वर्षानुवर्ष सण साजरा करताना काही पद्धती पडतात. पण त्या पद्धती बंद करताना केवळ कायद्याच्या बडग्याने बंद न करता लोकांना विश्वासात घेऊन त्यावर मार्ग काढणं अधिक गरजेचं आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले.

“कायदा तर वापरावा लागतो त्याशिवाय बंद होत नाही. पण त्या सोबत लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं गरजेचं असतं. आज माझी पुणे सीपींशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की, बऱ्याच गोष्टींवर सर्वांच एकमत झालं आहे. विशेषत ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो. डीजेमध्ये भूकंप आल्यासारखा आवाज असतो अशा सगळ्या गोष्टींवर जवळपास सर्वांच एकमत होतय. मला वाटतं पुण्यात गणेशोत्सव असेल, इतर सर्व उत्सव असतील, चांगल्या पारंपारिक पद्धतीने साजरे होताना दिसतील. लोक सहभागानेच हे डीजेचं स्तोम कमी होताना, संपताना दिसेल” असं मुख्यमंत्री म्हणाले.

दिशा पक्की ठरली आहे

डीजेसाठी काही धोरण तयार करणार का? यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “पॉलिसी एकदम तयार होत नाही. अनुभव असा आहे की, सगळ्या ठिकाणी चर्चेतून 90 ते 95 टक्के लोक तयार होतात. मग आदेश काढता येतो. मला वाटतं थोडावेळ दिला पाहिजे. दिशा पक्की ठरली आहे, आपल्याला पारंपारिकतेकडे किंवा खूप, प्रचंड ध्वनिप्रदूषण त्यापासून आपल्याला दूर जायचं आहे” असं फडणवीस म्हणाले. काही मंडळांनी आम्ही डीजे वापरणारच अशी भूमिका घेतली आहे. ‘यावर पोलीस मंडळं आपसात चर्चा करुन त्यावर मार्ग काढतील’ असं फडणवीसांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us