Maharashtra Corona Update | 'गुडन्यूज', राज्यात सर्वाधिक 8,381 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 62 हजारांच्या पार

राज्यात आज दिवसभरात तब्बल 8 हजार 381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे.

Maharashtra Corona Update | 'गुडन्यूज', राज्यात सर्वाधिक 8,381 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 62 हजारांच्या पार

मुंबई : राज्यात आज दिवसभरात तब्बल 8 हजार 381 रुग्णांना (Maharashtra Corona Latest Update) डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 26 हजार 997 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात आज दिवसभरात 2 हजार 682 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 62 हजार 228 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 116 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 2 हजार 098 वर (Maharashtra Corona Latest Update) पोहोचली आहे.

राज्यात सध्या 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 116 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 2098 इतकी झाली आहे.

आज झालेल्या 116 मृत्यूपैकी मुंबईचे 38, नवी मुंबईतील 9, भिवंडीतील 3, रायगडमधील 2, पनवेलमधील 1, ठाण्यातील 1, कल्याण-डोंबिवलीतील 1, जळगावातील 17, नाशकातील 3, मालेगावातील 5, धुळ्यातील 7, सोलापूरचे 3, औरंगाबादचे 5, पुण्यातील 13, मीरा-भाईंदरमधील 3, कोल्हापुरातील 3 आणि अमरावतीतील दोघांचा समावेश आहे. (Maharashtra Corona Latest Update)

राज्यातील रुग्ण दुपटीचा वेग 15 दिवसांवर

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11 दिवस होता, तो आता 15.7 दिवस झाला आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 43.38 टक्क्यांवर गेले आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.37 टक्क्यांवर आला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. सध्या राज्यात 5 लाख 35 हजार 467 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 35 हजार 967 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई95100666335405
पुणे (शहर+ग्रामीण)42092172021152
ठाणे (शहर+ग्रामीण)65324295481769
पालघर 102265223202
रायगड91104222167
रत्नागिरी91662432
सिंधुदुर्ग2622205
सातारा1855107169
सांगली64838519
नाशिक (शहर +ग्रामीण)76634435306
अहमदनगर (शहर+ग्रामीण)98056426
धुळे161086478
जळगाव 63553661361
नंदूरबार 28216711
सोलापूर44782233357
कोल्हापूर 132283120
औरंगाबाद86594489345
जालना108458047
हिंगोली 3442862
परभणी2271197
लातूर 75835037
उस्मानाबाद 41025117
बीड2411245
नांदेड 63925427
अकोला 1900154795
अमरावती 91664737
यवतमाळ 46929814
बुलडाणा 42021617
वाशिम 2531105
नागपूर2156140423
वर्धा 44141
भंडारा175902
गोंदिया 2171623
चंद्रपूर1841020
गडचिरोली136711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)210031
एकूण2,67,6651,49,00710,695

Maharashtra Corona Latest Update

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्या महिलेकडून 4 जणांना कोरोना संसर्ग, 15 जणांचा अहवाल बाकी

दीड वर्षाच्या बाळापासून दूर राहून नर्सची 14 दिवस रुग्णसेवा, कोरोनाच्या लढाईत योगदान

लॉकडाऊन काळात दीड लाखांहून अधिकांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यामागे नेमकं कारण काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *