राज्यात दिवसभरात 10 हजार, 24 दिवसात 2 लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 4 लाखांच्या पार

राज्यात आज (31 जुलै) दिवसभरात कोरोनाचे तब्बल 10 हजार 320 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

राज्यात दिवसभरात 10 हजार, 24 दिवसात 2 लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 4 लाखांच्या पार

मुंबई : राज्यात आज (31 जुलै) दिवसभरात कोरोनाचे तब्बल 10 हजार 320 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे काल (30 जुलै) दिवसभरात राज्यात सर्वाधिक 11 हजार 147 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे दोन दिवसात तब्बल 21 हजार 467 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

24 दिवसात 2 लाख 10 हजार रुग्ण वाढले

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. राज्यात 6 जुलैपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 11 हजार 387 इतका होता. मात्र, 24 दिवसात हा आकडा दुप्पट वाढला आहे. राज्यात आज कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिवसभरात 7 हजार 543 रुग्णांनी कोरोनावर मात

राज्यात आज दिवसभरात 7 हजार 543 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 2 लाख 56 हजार 158 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 50 हजार 665 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60.68 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात 265 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 265 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतील 53 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.55 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 14 हजार 994 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात 8 लाख 99 हजार 557 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 21 लाख 30 हजार 98 नमुन्यांपैकी 4 लाख 22 हजार 118 नमुने पॉझिटिव्ह (19.81 टक्के) आले आहेत. राज्यात 8 लाख 99 हजार 557 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 39 हजार 535 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुगण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई123382965866499
पुणे (शहर+ग्रामीण)113004699302728
ठाणे (शहर+ग्रामीण)104935810953008
पालघर 1840812179424
रायगड2014315658510
रत्नागिरी2119140578
सिंधुदुर्ग4893469
सातारा56793482172
सांगली46871986124
नाशिक (शहर +ग्रामीण)2059712621569
अहमदनगर (शहर+ग्रामीण)9111492897
धुळे40632541127
जळगाव 144389767611
नंदूरबार 92351543
सोलापूर117126841580
कोल्हापूर 88853347218
औरंगाबाद1629810660545
जालना2460161886
हिंगोली 78654617
परभणी102846039
लातूर 36381535146
उस्मानाबाद 224985862
बीड167155531
नांदेड 30811083107
अकोला 29812447129
अमरावती 2809193082
यवतमाळ 146696044
बुलडाणा 1900109052
वाशिम 93056118
नागपूर85852756230
वर्धा 2801779
भंडारा3722432
गोंदिया 5443144
चंद्रपूर7353821
गडचिरोली4203082
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)524054
एकूण51533235171017757
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *