Corona Update | राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार 504 वर

राज्यात आज (18 जून) दिवसभरात 3 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे.

Corona Update | राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार 504 वर
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 12:19 AM

मुंबई : राज्यात आज (18 जून) दिवसभरात 3 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 672 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Maharashtra Corona Update).

राज्यात आतापर्यंत 5 हजार 751 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात सध्या 53 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 100 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 66 पुरुष तर 34 महिला रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आज नोंद झालेल्या 100 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 45 रुग्ण आहेत, तर 46 रुग्ण हे वयवर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. याशिवाय 9 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. राज्यात आतापर्यंत 5 हजार 751 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा डबलिंग रेट 26 दिवसांवर

“राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा (डबलिंग रेट) कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे”, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा : Pune Corona Update | पुणे विभागात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.51 टक्क्यांवर

राज्यात 5 लाख 81 हजार 650 लोक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात सध्या 58 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 101 प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 17 हजार 683 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 504 नमुने पॉझिटिव्ह (16.93 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 81 हजार 650 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 2203 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 92 हजार 141 खाटा उपलब्ध असून सध्या 26 हजार 740 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.