Maharashtra Corona Update | राज्यात सलग पाचव्या दिवशी 3 हजार पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज, पण बाधितांचा आकडा वाढताच

राज्यात आज (7 जुलै) दिवसभरात 3 हजार 296 रुग्णांनी कोरोनावर मात केली (Maharashtra Corona Update). त्यामुळे त्यांना रुग्णालातून डिस्चार्ज देण्यात आला.

Maharashtra Corona Update | राज्यात सलग पाचव्या दिवशी 3 हजार पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज, पण बाधितांचा आकडा वाढताच

मुंबई : राज्यात आज (7 जुलै) दिवसभरात 3 हजार 296 रुग्णांनी कोरोनावर मात केली (Maharashtra Corona Update). त्यामुळे त्यांना रुग्णालातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून सलग 3 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण, एकीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात आज (7 जुलै) दिवसभरात 5 हजार 134 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 17 हजार 121 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात गेल्या पाच दिवसात 18 हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 54 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात सध्या 89 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात कोरोनामुळे आज दिवसभरात 224 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतीलच 64 रुग्णांचा समावेश आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर हा 4.26 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 नमुने पॉझिटिव्ह (18.67 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 31 हजार 985 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 45 हजार 463 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोना रुग्णांची अद्यावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई114284870746353
पुणे (शहर+ग्रामीण)89231373112099
ठाणे (शहर+ग्रामीण)93342588362585
पालघर 156199323327
रायगड1653810858373
रत्नागिरी170092662
सिंधुदुर्ग3682717
सातारा38722169138
सांगली234594063
नाशिक (शहर +ग्रामीण)147508931462
अहमदनगर (शहर+ग्रामीण)4740276061
धुळे30611943101
जळगाव 108267385518
नंदूरबार 62941431
सोलापूर91294615504
कोल्हापूर 50601590105
औरंगाबाद138968250482
जालना1940143474
हिंगोली 55042512
परभणी64333324
लातूर 2067102089
उस्मानाबाद 97151845
बीड75726920
नांदेड 169574675
अकोला 25931951115
अमरावती 2034137060
यवतमाळ 94350827
बुलडाणा 128368539
वाशिम 59136112
नागपूर4835193073
वर्धा 1961024
भंडारा2451942
गोंदिया 2882303
चंद्रपूर4302610
गडचिरोली2692251
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)398048
एकूण42211825612814994
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *