AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 5,024 नवे रुग्ण, आकडा 1 लाख 52 हजारांच्या पार

गेल्या 24 तासात 2 हजार 362 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 79 हजार 815 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 5,024 नवे रुग्ण, आकडा 1 लाख 52 हजारांच्या पार
| Updated on: Jun 26, 2020 | 10:54 PM
Share

मुंबई : गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक 5 हजार 024 नवीन (Maharashtra Corona Latest Update) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 362 रुग्णांना गेल्या 24 तासात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 79 हजार 815 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. राज्यात अनलॉक 1 ची घोषणा झाल्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणार वाढ प्रशासनाची (Maharashtra Corona Latest Update) चिंता वाढवणारी आहे

राज्यात कोरोनामुळे 7106 रुग्णांचा मृत्यू

आज दिवभरात 175 रुग्णांच्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी गेल्या 48 तासात 91 जणांचा मृत्यू तर उर्वरित 84 जणांचा मृत्यू मागील काळातील आहे. आतापर्यंत राज्यात 7 हजार 106 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.65 टक्के इतका आहे.

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.25 टक्के

राज्यात आज दिवसभरात 2 हजार 362 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 79 हजार 815 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 52.25 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या राज्यात 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Maharashtra Corona Latest Update).

राज्यात 5 लाख 58 हजार 488 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात 5 लाख 58 हजार 488 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 903 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 हजारांच्या पार

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 787 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 19 हजार 027 वर पोहोचली आहे. तर आज जिल्ह्यात 19 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 674 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Latest Update

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मोठा आधार, निवृत्तीपर्यंत शासकीय निवास, 65 लाखांची मदत

बँक कर्मचारी दुर्लक्षित कोरोना योद्धे, विमा संरक्षण देण्याची मनसेची ठाकरे सरकारकडे मागणी

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.