AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंगपिसाट खरातवरील सिनेमात ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचीही भूमिका, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Maharashtra Epstein Files : खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स असं या सिनेमाचं नाव असणार आहे. यात ठाकरे गटाच्या महिला नेत्याचीही भूमिका असणार आहे.

लिंगपिसाट खरातवरील सिनेमात ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचीही भूमिका, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Maharashtra Epstein FilesImage Credit source: Google
| Updated on: May 31, 2026 | 8:32 PM
Share

नाशिकच्या भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण राज्याला हादरा बसला होता. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे, तसेच त्यांने भोंदूगिरी करून आणि आर्थिक गैरव्यव्हार करून अमाप संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. सध्या खरातची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अशातच आता खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स असं या सिनेमाचं नाव असणार आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यद या खरातवरील चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. अशातच आता या सिनेमात शिवसेना ठाकरे गटाच्य़ा एका महिला नेत्याचाही सहभाग असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार – अंधारे

महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स या चित्रपटात भूमिका साकारत असल्यामुळे दीपाली सय्यद यांना धमक्या मिळाल्या आहेत. याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, ‘मला खात्री आहे काही होणार नाही, चित्रपट येणारच. मी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे आणि त्यांना संपूर्ण प्रकरण सांगणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मला फोनवरून धमक्या येत आहेत. त्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.’

महाराष्ट्र एपस्टिन फाईल्समध्ये सुषमा अंधारे दिसणार

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स या चित्रपटात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चांगली भूमिका निभावली असती असं विधान केलं आहे. याबाबत विचारले असता सय्यद म्हणाल्या की, ‘सुषमा अंधारे यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करायला नको होते. सुषमा अंधारे या एक महिला असताना त्यांनी अशी चेष्टा करू नये, कारण त्यांचा देखील चित्रपटात रोल आहे. लवकरच चित्रपटाच्या शुटींगला सुरवात होणार आहे. तुम्ही थियेटरमध्ये चित्रपट बघा.

महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स या सिनेमाचं दिग्दर्शन स्वरुप सावंत करणार आहेत. भोंदू खरातच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात अनेक कलाकार झळकणार आहेत. अशोक खरातच्या भूमिकेसाठी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मीच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा चित्रपट 2 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा