दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये येणार, पण सर्वांनाच मिळणार नाहीत? पात्रतेच्या अटी समोर!

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, ही रक्कम नेमकी कोणाला मिळणार? कोणत्या गोष्टी पूर्ण असणं आवश्यक आहे?

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये येणार, पण सर्वांनाच मिळणार नाहीत? पात्रतेच्या अटी समोर!
Maharashtra Farmers Relief
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 4:19 PM

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. पावसाने दडी मारल्यानंतर आता खरीपच्या नुकसानीनंतर रबी पिकांचा खर्च कसा करायचा याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत सरकारने जाहीर केली आहे.

याबद्दलची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने प्राथमिक मदत करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Loading...

पावसाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. आधी २६५ तालुक्यांना बाधित म्हणून घोषीत केल्यानंतर आता त्यामध्ये आणखी ४० तालुक्यांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्याच्या ३५८ तालुक्यांपैकी ३०५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण विचार करता ८५ टक्के पेक्षा जास्त तालुके हे सध्या दुष्काळाचा सामना करत आहेत.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची प्राथमिक मदत जाहीर केली आहे. ही मदत दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांनाच वितरित केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक नुकसान पंचनामा पूर्ण झाला आहे आणि ज्यांच्या माहितीची पडताळणी झाली आहे, त्यांना ही मदत सर्वप्रथम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि सर्व अटींचा संपूर्ण तपशील सरकार जाहीर केल्यानंतरच कोणत्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळेल हे स्पष्ट होणार आहे.

मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये याचा परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या कमतरतेमुळे शेतांमधील ओलावा कमी झाला असून, त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकाची तयारी करणे अवघड झाले आहे. दुष्काळामुळे अनेक भागांमध्ये भूजल पातळी खालावत आहे. मराठवाड्यात पाण्याची पातळी तीन मीटरपर्यंत खाली गेल्याचे वृत्त आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us