Video | आगीच्या घटना सुरुच, नवी मुंबईतील वाशीमध्ये एका इमारतीला आग

आगीच्या घटना सुरुच, नवी मुंबईतील वाशीमध्ये एका इमारतीला आग Fire breaks in Vashi area of Navi Mumbai

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:28 PM, 11 Apr 2021
Video | आगीच्या घटना सुरुच, नवी मुंबईतील वाशीमध्ये एका इमारतीला आग
Vashi Fire

नवी मुंबई: महाराष्ट्रातील आगीच्या घटना थांबत नसल्याचं दिसत आहे. नागपूरच्या रुग्णलयाला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज नवी मुंबईत एका इमारतीला आग लागली आहे. ही घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली. वाशीतीली रिअल टेक पार्क या इमारतीला आग लागल्याची माहिती आहे. एएनआयनं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. (Maharashtra Fire broke out at a building in Vashi area of Navi Mumbai fire brigade try to control fire)

वाशीत इमारतीला आग

एएनआयचं ट्विट

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न

नवी मुंबईतील वाशीमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

धुरांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण

नवी मुंबईतील वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीला आग लागली आहे. ही  इमारत वाशी रेल्वे स्थानाकासमोर आहे.  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगीमुळे धुराचे मोठ्या प्रमाणात लोट आहेत. त्यामुळे धुरांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण निर्माण झाली आहे.  धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं मुश्किल झाल्याची माहिती आहे.

शॉर्टसर्किट मुळे आग, प्राथमिक अंदाज

अग्निशमन दलानं वाशी येथील रिअल टेक इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला आहे.  वाशी शहरातील मुख्य ठिकाणावर ही घटना घडली. मात्र, वीकेंड लॉकडाऊन असल्यानं परिसरात कमी प्रमाणात गर्दी होती.

नागपूरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू

नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली होती. या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर तिथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला.  आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. मात्र या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या: 

Corona Hospital Fire : नागपुरात कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग, तिघांचा मृत्यू!