AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Edited By: | Updated on: Nov 30, 2022 | 11:15 AM
Share

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breakingImage Credit source: tv9

मुंबई : आज दिनांक 7 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज औरंगाबामध्ये सिल्लोड येथे सभा घेत आहेत. यानिमित्त सभास्थळी एक लाखांहून अधिक लोकांची गर्दी जमा होईल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. सभास्थळी जय्यत तयारी सुरु आहे. तर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुलढाण्यात सभा घेणार. आदित्य सभेवर ठाम. आदित्य ठाकरे आज अकोल्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांशी संवाद साधणार. पालघरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक. 25 प्रवासी जखमी. जीवितहानी नाही.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Nov 2022 05:13 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा

    कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांची सभा

    अवघ्या थोड्या वेळातच होणार सभेला सुरुवात

    सिल्लोड नगरपरिषदेच्या मैदानात होत आहे श्रीकांत शिंदेंची सभा

    सभेला शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे देखील राहणार उपस्थित

  • 07 Nov 2022 04:37 PM (IST)

    राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक

    नगर जिल्ह्यातून जाऊन दाखवा, तुमच्या गाड्या फोडणार, निलेश लंके यांचे सत्तार यांना आव्हान

    महसूलमंत्री अब्दुल सत्तार हा एक सरडा आहे

    सत्तार याने सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरला, त्याला सत्तेचा माज आला आहे

    सत्तार तू लाल दिव्याच्या गाड्या घेऊन ये, तुझ्या गाड्या फोडून टाकेन. नगर जिल्ह्यातून जाऊन दाखवच

    सत्तार राज्यातील महिलांच्यावतीने तुझा निषेध करतो, निलेश लंके यांनी ललकारले

  • 07 Nov 2022 04:00 PM (IST)

    अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात ठाणे राष्ट्रवादी आक्रमक

    ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर करण्यात येत आहे आंदोलन

    अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील तयार करण्यात आला आहे

    माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आंदोलन

  • 07 Nov 2022 04:00 PM (IST)

    श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी 76 वर्षांचे आजोबा

    मुख्यमंत्र्याच्या सुपुत्राने महागाई कमी करावी

    आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषण करावे

    शेतकऱ्यांना मदत देण्याची इच्छा या आजोबांनी व्यक्त केली आहे

    आजोबा म्हणतात मी आणीबाणी पहिली पण एवढी महागाई पहिली नाही

    इंदिराबाई गरिबांसाठी महागाई कमी करत होत्या

    आजच्या सभेत मुख्य मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना मदत द्यावी एवढीच आजोबांची अपेक्षा

  • 07 Nov 2022 03:25 PM (IST)

    मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी काही वेळात वर्षा निवासस्थानी दाखल होणार

    बेस्टमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप

    त्याबाबत योग्य ती कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांना देणार निवेदन

    मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे काही वेळात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

  • 07 Nov 2022 01:25 PM (IST)

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत राडा

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते व व्यापाऱ्यांचे आंदोलन

    एका व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी झाल्याने पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याचा व्यापारांचा आरोप

    तर दुसरीकडे अडते व व्यापारी यांचं आंदोलन असल्याने शेतमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी आक्रमक

    अमरावती बाजार समिती बंद, बाजार समितीत पोलिसांचा चोख बंदोबस्त

    शेतमाल खरेदी होत नसल्याने बाजार समितीत आंदोलन

  • 07 Nov 2022 12:39 PM (IST)

    शेतकऱ्याचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा दिला होता इशारा

    ट्रॅक्टर खरेदीच्यावेळी दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तीस देऊन फसवणूक केल्याची दिली होती तक्रार

    भोकरदन येथील सोनालीका ट्रॅक्टर शोरूमने फसवणूक केल्याचे जिल्ह्याधिकारी यांना दिले होते निवेदन

    संतोष पाटोळे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते बदनापूर तालुक्यातील आहेत

    खरेदीच्यावेळी दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तींस देत फसवणूक केल्याचे म्हणणे

  • 07 Nov 2022 11:50 AM (IST)

    शिंदे गटाचे मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

    प्रकाश सुर्वे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची सुपारी दिली?

    प्रकाश सुर्वे यांच्या नावाने ऑडियो क्लिप व्हायरल

    युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येसाठी प्रकाश सुर्वे यांनी दिले पैसे?

    ऑडियो क्लिप मधील दाव्यामुळे एकच खळबळ

    मुख्यमंत्री प्रकाश सुर्वेंची चौकशी करणार?

  • 07 Nov 2022 10:24 AM (IST)

    औरंगाबादच्या सिल्लोड शहरात आज श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा

    श्रीकांत शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी

    सभेला एक लाख लोक येणार असल्याचा आयोजकांचा दावा

    जिल्हा परिषद मैदानावर श्रीकांत शिंदे यांच्या सभेची तयारी पूर्ण

    सभेला अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल राहणार उपस्थित

  • 07 Nov 2022 10:20 AM (IST)

    नाशिकच्या सिडको कार्यालयावरून राजकीय वातावरण तापलं

    छगन भुजबळांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

    कार्यालय जैसे थे ठेवण्याची केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    नाशिकमधील सिडको कार्यालय बंद करण्याचा प्रशासनाने घेतला निर्णय

    सिडको कार्यालय औरंगाबादला हलवण्याची प्रशासनाची तयारी

    मात्र कार्यालय हलवण्यास भुजबळांचा देखील विरोध

  • 07 Nov 2022 10:18 AM (IST)

    राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची तेलंगणातून महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू

    – आज संध्याकाळी भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये प्रवेश करणार आहे

    – तेलंगणामध्ये मोठा प्रतिसाद या यात्रेला पहावयास मिळत आहे.

    – रात्री 9 वाजता नांदेडमध्ये राहुल गांधींची पदयात्रा सुरु होणार

  • 07 Nov 2022 10:16 AM (IST)

    थोड्याच वेळात ईडब्ल्यूएस बाबत महत्त्वपूर्ण निर्णय

    सर्वोच्च न्यायालय देणार महत्त्वाचा निकाल

    सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच घटनापीठ निर्णय देणार

    चारही न्यायाधीशांचे निर्णय वेगवेगळे

    सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायाधीश माहेश्वरी यांचा एकत्रित निर्णय

    बाकी तीन न्यायाधीशांचा वेगवेगळा निर्णय

    बहुमत असेल तोच निर्णय अंतिम असणार

    सरन्यायाधीश उदय ललित यांच्यासह न्यायाधीश रवींद्र भट, दिनेश माहेश्वरी, जे बी पार्डी वाला आणि बेला एम त्रिवेदी यांचा घटनापीठामध्ये समावेश

  • 07 Nov 2022 10:14 AM (IST)

    श्रीकांत शिंदे, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी 500 पोलिसांचा बंदोबस्त

    5 डीवायएसपी, 50 पोलीस अधिकारी आणि एसआरपीएफच्या एका तुकडीसह 450 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्त

    आदित्य ठाकरे संवाद दौरा आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  • 07 Nov 2022 09:37 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये रेशनिंग दुकानात आता फोन,वीज,पाणी बिल भरता येणार

    महा-ई सेवेप्रमाणे रेशनिंग दुकानात आता ह्या सर्व मल्टिपर्पज सुविधा मिळणार राज्य शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे

    ह्या उपक्रमाची शहरा प्रमाणे ग्रामीण भागातील पुरवठा विभागाने तयारी सुरू केलीय

    हे सेवा केंद्र सुरू करण्याआधी सेवा केंद्र कशा प्रकारे चालवायच त्याच रेशनिंग दुकांनधारकाना देणार प्रशिक्षण

  • 07 Nov 2022 09:34 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरात आज श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा

    श्रीकांत शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी

    सभेला एक लाख लोक येणार असल्याचा आयोजकांचा दावा

    जिल्हा परिषद मैदानावर श्रीकांत शिंदे यांच्या सभेची तयारी पूर्ण

    सभेला अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल राहणार उपस्थित

  • 07 Nov 2022 09:32 AM (IST)

    आदित्य ठाकरे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

    आदित्य ठाकरे यांची बाळापूर शहरात शेतकरी संवाद यात्रा

    शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

    शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यादाच आदित्य ठाकरे पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर…

  • 07 Nov 2022 09:29 AM (IST)

    नाशिक – राज ठाकरेंनी सुरू केलेल्या बोटॅनिकल गार्डन मध्ये पुन्हा चोरी

    बॅटरीवर चालणाऱ्या हत्तींसाठी लागणारे उपकरण गेले चोरीला

    इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    यापूर्वी देखील चोरीच्या घटना

    बोटॅनिकल गार्डन सध्या वनविभागाच्या ताब्यात

    मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे चांगल्या प्रकल्पाचे नुकसान

Published On - Nov 07,2022 9:20 AM

Follow us
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.