Maharashtra News Live Update : आजच्या महत्वाच्या घडामोडी…

| Updated on: Nov 28, 2022 | 7:18 AM

सर्व घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर...

Maharashtra News Live Update : आजच्या महत्वाच्या घडामोडी...

आज 27 नोव्हेंबर, रविवार. आजचा दिवस राज्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या मंत्री, आमदार खासदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेत. अशात विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जाते. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काल काळी शाई फेकण्यात आली. त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सर्व घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Nov 2022 07:47 PM (IST)

    सगळीकडे सध्या चिखल झाला आहे

    Marathi News LIVE Update सगळीकडे सध्या चिखल झाला आहे

    भविष्यातील पिढ्यांना आदराची स्थान कोणती ठेवणार

    सतत दोषांवर बोटं ठेवत राहिलो तर हाताला काही लागणार नाही

    या सर्व सिस्टिमवरचा लोकांचा विश्वास राहिला नाही

    राज ठाकरे यांचे वक्तव्य

  • 27 Nov 2022 07:44 PM (IST)

    महापुरुषांची बदनामी करुन काय मिळणार आहे

    Marathi News LIVE Update

    महापुरुषांची बदनामी करुन काय मिळणार आहे

    हे सर्व राजकीय पक्षांनी टाळायल पाहिजे,

    काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षाना माझे सांगणे-राज ठाकरे

    पंडित नेहरंचं अफेअर होतं, असा फोटो व्हायरल करण्यात आले

    पण ती मुलगी नेहरुंच्या परिवारातील होती

    प्रत्येक जण नेत्यांच्या बदनामीत लागलं आहे

  • 27 Nov 2022 07:43 PM (IST)

    दयेचा अर्ज नव्हता, सावकरांची रणनीती होती

    Marathi News LIVE Update राहुल गांधी यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल

    राहुल गांधींची लायकी आहे का सावरकर यांच्यावर बोलायची

    काय हालअपेष्टा सहन केल्या, कुठे होते, काही माहिती आहे का

    स्ट्रॅटर्जी असते, पण त्याकडे दुर्लक्ष केले, सर सलामत तो पगडी पच्चास

    हीच आमची कृष्णनीती आहे, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलण्याची गरज असते, बोलावं लागतं

    दयेचा अर्ज नव्हता, सावकरांची रणनीती होती

  • 27 Nov 2022 07:36 PM (IST)

    राज्यातील एक मंत्री महिला नेत्याला भिकार म्हणतो

    Marathi News LIVE Update राज्यातील एक मंत्री महिला नेत्याला भिकार म्हणतो

    राज ठाकरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर साधला निशाणा

    तरुण, महाविद्यालयातील विद्यार्थी हे पाहत असतील तर त्यांना राजकारणावर प्रश्न पडेल

    जाती-पातीचं विष कालविण्याचे संस्कार आपल्याकडे केले का?

    राज्यातील अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्र सोडून शिक्षण, नोकऱ्यासाठी बाहेर जात आहेत

    राज्यातील वातावरण प्रदूषीत झाले आहे-राज ठाकरे

  • 27 Nov 2022 07:31 PM (IST)

    राज्यपाल पदावर असल्याने मान राखतो, नाहीतर शिव्यांची कमी नाही

    Marathi News LIVE Update राज्यपाल पदावर असल्याने मान राखतो, नाहीतर शिव्यांची कमी नाही

    गुजराती, मारवाडी यांनी त्यांच्या राज्यात का नाही उद्योगधंदे सुरु केले आहे

    कारण महाराष्ट्राची जमीन उद्योगधंद्यांना सुपीक होती-राज ठाकरे

    महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारी यांच्याकडून ऐकायचं नाही

  • 27 Nov 2022 07:29 PM (IST)

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर चालले आहे, काय चालले माहिती नाही

    Marathi News LIVE Update

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर चालले आहे, काय चालले माहिती नाही

    2104 साली ही मी हेच म्हटलं होतं, राज ठाकरे यांनी केली टीका

    प्रकल्प कुठल्याही राज्यात जाऊ दे, मागासलेल्या राज्यात जाऊ दे

    त्यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच नाही, बेरोजगारांच्या हाती रोजगार मिळणे आवश्यक

    गुजरात गुजरात करु नका, प्रत्येक राज्याकडे समान नजरेने पहाणं आवश्यक आहे.

  • 27 Nov 2022 07:26 PM (IST)

    मशिदींवरचे भोंगे उतरविण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती

    Marathi News LIVE Update

    मशिदींवरचे भोंगे उतरविण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती

    बाळासाहेबांची इच्छा मनसेने पूर्ण केली -राज ठाकरे

    जिथे जिथे भोंगे सुरु आहे, तिथे पोलिसांकडे तक्रार करा

    पोलिसांनी दखल घेतली नाही, तर मोठ्या ट्रकवर मोठ्याने हनुमान चालीसा वाजवा

    आरे ला कारे होत नाही तोपर्यंत असेच होत राहणार

  • 27 Nov 2022 07:22 PM (IST)

    राज ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे यांची नक्कल

    Marathi News LIVE Update

    मुख्यमंत्री पदावर तब्यतीचं कारण सांगून ..

    राज ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे यांची नक्कल

    मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून कांडी फिरवली

    आता फिरत आहेत राज्यभर, राज ठाकरे यांची ठाकरेंवर सडकून टीका

    पैशांसाठी आणि स्वार्थासाठी कोणच्या हातात हात घालून बागेत फिरलो नाही

    राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

  • 27 Nov 2022 07:14 PM (IST)

    टोल आंदोलनाला भव्य यश मिळाले

    Marathi News LIVE Update टोल आंदोलनाला भव्य यश मिळाले

    राज्यातील 65-70 टोल नाके बंद झाले

    मनसेच्या यशाबद्दल राज ठाकरे यांचे वक्तव्य

    टोलमुक्तीच्या घोषणा करणाऱ्यांना मात्र कोणीच प्रश्न विचारत नाही-ठाकरे

  • 27 Nov 2022 07:11 PM (IST)

    वातावरणात निवडणूक दिसत नाही

    Marathi News LIVE Update

    वातावरणात निवडणूक दिसत नाही

    महाराष्ट्रात सध्या मोठा खोळंबा

    या गटाला मान्यता मिळणार की नाही, याचीच चर्चा

    फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणूक लागू शकते

    राज ठाकरे यांनी केला अंदाज व्यक्त

  • 27 Nov 2022 07:08 PM (IST)

    राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

    Marathi News LIVE Update राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

    गट अध्यक्षांच्या मेळाव्यात भाषणाला केली सुरुवात

    गोरेगाव येथील मेळाव्यात कोणत्या विषयावर बोलणार

    कोणचा घेणार समाचार, कोणावर करणार हल्लाबोल

  • 27 Nov 2022 04:58 PM (IST)

    चांदीचा आलेख उंचावला, सोने ही झाले महाग

    Marathi News LIVE Update

    चांदीचा आलेख उंचावला, सोने ही झाले महाग

    आठवड्याभरात किंमतींमध्ये चांगलीच वाढ

    चांदीचा भाव 1387 प्रति किलोने वाढला

    तर सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 254 रुपयांची वाढ

  • 27 Nov 2022 04:18 PM (IST)

    नोटबंदीतील बाद 500, 1000 रुपयांच्या नोटा बदलता येणार!

    Marathi News LIVE Update

    नोटबंदीतील बाद 500, 1000 रुपयांच्या नोटा बदलता येणार!

    सुप्रीम कोर्टात नोटा बदलण्यासाठी दाखल याचिकेत संकेत

    नोटा बदलण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी विचार करणार -न्यायालय

    केवळ विशेष प्रकरणातच ही सूट देण्यात येणार

  • 27 Nov 2022 01:54 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या यांच्या गोरेगाव येथील मेळाव्याला ठाण्यातील कार्यकर्ते लावणार हजेरी

    राज ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडीवर देणार उत्तर, राज यांचे विचार ऐकण्यासाठी मेळाव्याला जात असल्याची कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

    आज मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा आहे, तर येत्या 10 तारखेला ठाण्यातील गट प्रमुखांचा मेळावा होणार असल्याची अविनाश जाधव यांची माहिती

    ठाणे शहरातील 800 हून अधिक गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यालाही हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत

  • 27 Nov 2022 12:38 PM (IST)

    देशी कट्ट्यासह 3 सराईत गुन्हेगारांना तलासरी पोलिसांकडून अटक

    तिन्ही सराईत गुन्हेगार संगमनेर येथील, एका देशी कट्ट्यासह पीकअप गाडी पोलिसांनी घेतली ताब्यात

    शनिवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास आड मार्गाने गुजरात राज्यात शिरकाव करण्याचा प्रयत्नात असताना नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

  • 27 Nov 2022 12:26 PM (IST)

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 40 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 40 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

    डीआरआयची मोठी कारवाई

    दोन परदेशी नागरिकांकडून 8 किलो हेरॉईन जप्त

  • 27 Nov 2022 12:07 PM (IST)

    महाराष्ट्र राज्य पोलीस भर्ती परीक्षेचे अर्ज भरणारी वेबसाईट संथ गतीने

    अजूनही हजारो विद्यार्थ्यांचे पोलीस भर्ती परीक्षेचे अर्ज भरणे बाकी

    हजारो विद्यार्थी पोलीस भर्तीपासून वंचित राहण्याची शक्यता

    पोलीस भर्ती प्रक्रियेचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर

    पोलीस भर्ती परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी

  • 27 Nov 2022 11:46 AM (IST)

    गोंदियात आता येऊ लागले हजारो किलोमीटर पार करत परदेशी पाहुणे

    विदेशी पक्ष्यांचे होत आहे आगमन

    जलाशय व पाणवठयावर भरु लागली शाळा

  • 27 Nov 2022 10:51 AM (IST)

    पुणे-बंगलोर महामार्गावर वारजे जवळील डुक्कर खिंडीत कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात

    पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झाला अपघात, अपघातात कोणीही जखमी नाही

    कंटेनर मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात असताना अपघात झाला

    ड्रायव्हरच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना घटना टळली

  • 27 Nov 2022 10:26 AM (IST)

    गजानन किर्तीकरांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र

    गजानन किर्तीकरांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र

    शिंदे गटाच्या 12 खासदारांच्या यादीत मलाही समाविष्ट करावं यासाठी दिलं पत्र

    लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात किर्तीकर बसणार शिंदे गटात

    लोकसभा अध्यांना पत्र लिहून केली विनंती

    अधिवेशनाच्या आधी किर्तीकरांचं पत्र

    लोकसभा अध्यक्ष देणार मंजूरी

  • 27 Nov 2022 09:58 AM (IST)

    सदानंद कदम यांना ईडीने बजावले समन्स

    सदानंद कदम यांना ईडीने बजावले समन्स

    मनी लाँड्रिंग प्रकरणी बजावले समन्स

    सदानंद कदम हे शिवसेना (ठाकरे गटातील) नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय

  • 27 Nov 2022 09:52 AM (IST)

    पुण्यात लवकरच Metro याही मार्गावर करणार सेवा सुरू

    पुणेकरांना आता लवकरच करता येणार वनाझ ते सिव्हील कोर्टपर्यंतचा प्रवास

    गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट मेट्रोची ट्रायल रन पूर्ण

    दोन्ही मार्गावरचं काम पूर्ण

  • 27 Nov 2022 09:28 AM (IST)

    पुण्यात पानटपरीचा वाद, आशिष कांबळेचा मध्यरात्री तीक्ष्ण शस्त्राने खून

    पुणे शहरात हत्यांचे प्रमाण वाढलं

    खडकी पोलिसांनी घेतल दोघांना ताब्यात, रात्री घडली घटना

    घराशेजारी पान टपरी टाकली म्हणून खुन्नसमुळे केला खून

    खडकी पोलिसांनी केले दोन कोयते जप्त

    पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

  • 27 Nov 2022 09:09 AM (IST)

    मनसेचं मिशन पश्चिम महाराष्ट्र

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आता मिशन पश्चिम महाराष्ट्र

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी कोल्हापुर दौऱ्यावर

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित

    राज ठाकरे यांचा दौरामुळे मनसेला नवी उभारी

  • 27 Nov 2022 08:55 AM (IST)

    भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ( रावण) उद्या पुणे दौऱ्यावर

    आझाद संवाद मेळाव्याचं केलं आयोजन

    पुण्यातील कँम्पात मेळाव्याचं आयोजन

    पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित...

  • 27 Nov 2022 08:22 AM (IST)

    पुण्यात 154 गोवरचे संशयित रुग्ण

    पुण्यात 154 गोवरचे संशयित रुग्ण

    महापालिकेचा विभाग अलर्ट मोडवर

    संशयित रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी हाफकीन संस्थेत पाठवण्यात आलेत

    त्यापैकी 80 टक्के नमुने निगेटिव्ह आले आहेत

    काही नमुन्यांचा अहवाल येणं बाकी आहे

    मात्र मुंबई, मालेगाव शहरातील उद्रेक पाहता आरोग्य विभाग अलर्टवर काम करत आहे

  • 27 Nov 2022 08:19 AM (IST)

    राजू शेट्टी एमएसपी हमीभाव कायदा अनिवार्य करण्यासाठी कार्यशाळा घेणार

    राजू शेट्टी एमएसपी हमीभाव कायदा अनिवार्य करण्यासाठी कार्यशाळा घेणार

    एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाचे अध्यक्ष व्ही.एम सिंग राहणार उपस्थित

    पुण्यात 1 डिसेंबरला होणार कार्यशाळा

    रामपाल जाठ राजस्थान, के, चंद्रशेखर कर्नाटकचे शेतकरी नेतेही सहभागी होणार

    राजू शेट्टींनी 15 दिवसांसाठी आपलं आंदोलन स्थगित केलंय

    राजू शेट्टी एमएसपी कायद्यावरून आक्रमक होण्याची शक्यता

  • 27 Nov 2022 08:16 AM (IST)

    कर्नाटकातून येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बसला काळे फासत पोस्टर्स लावले

    कर्नाटकातून येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बसला काळे फासत पोस्टर्स लावले

    कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवत काळे फासले

    बसवर चढून केली महाराष्ट्र विरोधी घोषणाबाजी

    कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर शहरात घडली घटना

    गाणगापूरहून अक्कलकोट येथे येत होती महाराष्ट्र शासनाची बस

    25 तारखेला ही घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय

Published On - Nov 27,2022 8:15 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.