Maharashtra Live News : आयोगाच्या भ्रष्ट कृतीविरोधात देशभरात संतापाची लाट- संजय राऊत

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अधिकच दणदणाट पाहायला मिळाला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक दणदणाट होता. यावर्षी सरासरी 105 डेसिबलची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Live News : आयोगाच्या भ्रष्ट कृतीविरोधात देशभरात संतापाची लाट- संजय राऊत
Live blog
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Sep 27, 2026 | 10:19 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Sep 2026 10:16 AM (IST)

    ही लोकशाहीची हत्या आहे- संजय राऊत

    ज्ञानेश कुमार हे लोकशाही विरोधात मोदी-शहा यांच्या इशाऱ्याने कार्यक्रम राबवत आहेत. दोन निवडणूक आयुक्तांनी बंड केलं. त्यांना एक्सपोज केलं आहे. भाजपला मदत होईल, लाभ होईल, असे निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त घेतात, ही लोकशाहीची हत्या आहे. स्वातंत्र्याची गळचेपी आहे. 13 कोटी नावे बेकायदेशीरपणे वगळली आहे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 27 Sep 2026 10:10 AM (IST)

    आयोगाच्या भ्रष्ट कृतीविरोधात देशभरात संतापाची लाट- संजय राऊत

    मोर्चातून संताप दाखवावा. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. आयोगाच्या भ्रष्ट कृतीविरोधात देशभरात संतापाची लाट पसरली आहे असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.


  • 27 Sep 2026 09:51 AM (IST)

    पोलिसात तक्रार द्यायला निघालेल्या पिता-पुत्राला कारने उडवले

    जळगावात जामनेर तालुक्यात पोलिसात तक्रार देण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या पिता-पुत्राला कारने उडविले. या घटनेत पिता ठार तर मुलगा गंभीर असून त्याच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर उत्तम मोरे (45) असे मृत पित्याचे नाव असून तर यश मोरे असे गंभीर जखमी २२ वर्षीय मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात बाळू जोशी, शांताराम जोशी आणि अजय जोशी या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून बाळू जोशी या एकाला अटक करण्यात आली आहे.

  • 27 Sep 2026 09:41 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे आज रविवारी दुपारी 1 वाजता  चर्मकार समाज मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. हा कार्यक्रम नागपूरच्या शिक्षक सहकारी बँक सभागृहात होईल. या सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार,याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

  • 27 Sep 2026 09:35 AM (IST)

    परभणीत दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

    परभणीत दुष्काळाने शेतकऱ्याचा बळी घेतला.  मिरखेल येथील 62 वर्षीय शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. मुकुंद एगडे असं मयत शेतकऱ्याचं नाव  आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


  • 27 Sep 2026 09:20 AM (IST)

    हिंगोलीत प्रसिद्ध शब्बू खिचडी हॉटेलवर FDAची कारवाई

    हिंगोलीच्या वारंगा फाटा येथील प्रसिद्ध शब्बू खिचडी हॉटेलवर FDAची कारवाई करण्यात आली आहे.  अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे, अस्वच्छता आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.  ग्राहकांना वर्तमानपत्रावरून खाद्यपदार्थ दिल्याचेही तपासणीत समोर आलं.  गंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

  • 27 Sep 2026 09:15 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर 8 महिन्यात 142 अपघात

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापेक्षा समृद्धी महामार्गावर अपघात आणि मृत्यू अधिक झाले आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांतील धक्कादायक आकडे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.  समृद्धी महामार्गावर १४२ अपघातांत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १०५ अपघातांत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 27 Sep 2026 08:57 AM (IST)

    आदित्य ठाकरे आज जालना जिल्हा दौऱ्यावर

    माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे आज जालना जिल्हा दौऱ्यावर असणार आहे.  माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील सोबत असणार आहेत. दुष्काळग्रस्त भागात जाऊन करणार पिकांची पाहणी तर शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधणार आहेत.   सकाळी 11 वाजता परतुर तालुक्यातल्या वरफळ गावात आदित्य ठाकरे पिकांची पाहणी करतील. तर दुपारी 1 वाजता जालना तालुक्यातल्या रामनगर या ठिकाणी आदित्य ठाकरे पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील.

गेल्या महिन्याभरापासून उत्सवातील ध्वनी प्रदूषण विरोधी चळवळीला बळ मिळाले असले तरी यंदा विसर्जन मिरवणुकीत उच्चांकी ध्वनी पातळी नोंदवली गेली. लक्ष्मी रोडवरील प्रमुख १० चौकात घेतलेल्या नोंदीतून सरासरी १०५ डेसिबल ध्वनी पातळीची नोंद झाली. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा ध्वनी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, दुसरीकडे ध्वनी प्रदुषण करणाऱ्या गणेश मंडळावर पोलिसांनी कारवाई केली. पिंपरी-चिंचवडमध्ये 91 मंडळावर कारवाई केली. तर नाशिकमध्येही 11 मंडळावर कारवाई केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us