AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती
| Updated on: Sep 18, 2020 | 8:17 AM
Share

मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) म्हणून मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. (Maharashtra Police IPS Officer Transfer)

गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. 22 पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. तर शिवदीप लांडे यांची दहशतवादविरोधी पथकात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे.

कोणाची बदली कुठे?

अमिताभ गुप्ता – पोलीस आयुक्त, पुणे शहर विनीत अगरवाल – प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई अनुप कुमार सिंह – उपमहासमादेशकर, गृह रक्षक दल, मुंबई संदीप बिश्नोई – अपर पोलीस महासंचालक, रेल्वे, मुंबई डॉ के व्यंकटेशम – अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान), मुंबई मनोज कुमार शर्मा – पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई जयंत नाईकनवरे – पोलीस उपमहानिरीक्षक, व्हीआयपी सिक्युरिटी, मुंबई निशीत मिश्रा – अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा) मुंबई शहर सुनील फुलारी – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर रंजन कुमार शर्मा – पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे शिवदीप लांडे – पोलीस उपमहानिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई

ब्रिजेश सिंह – विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), मुंबई मकरंद रानडे – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

संजय बाविस्कर – पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे नविनचंद्र रेड्डी – अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर दिलीप झळके – अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहर जालींदर सुपेकर – अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर एम. बी. तांबाडे – संचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई विनय कारगांवकर – अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई

(Maharashtra Police IPS Officer Transfer)

मोहित कुमार गर्ग – रत्नागिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने – ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे – सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सचिन पाटील – नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील- अहमदनगर पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे – जळगाव पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम – सांगली पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे – कोल्हापूर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख – जालना पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी – बीड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे – नांदेड पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे – लातूर पोलीस अधीक्षक जयंत मीना – परभणी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर – हिंगोली पोलीस अधीक्षक वसंत जाधव – भंडारा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर – वर्धा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे – चंद्रपूर पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे – गोंदिया पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया – बुलडाणा पोलीस अधीक्षक डी. के. पाटील भुजबळ – यवतमाळ पोलीस अधीक्षक अंकित गोयल – गडचिरोली पोलीस अधीक्षक

(Maharashtra Police IPS Officer Transfer)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.