AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या ‘शशी थरुर’ने तुकाराम मुंढेंबद्दल हे काय सांगितलं? असं बोलून गेले की… त्या शब्दांची तुफान चर्चा!

Vidyanand Bapat : पुणे पोलिसांनी डीजेच्या आवाजावर मर्यादा निश्चित केल्या आहेत. यावर महाराष्ट्राचे शशी थरुर म्हणून ओळखले जाणारे विद्यानंद बापट यांनी भाष्य केले आहे. बापट यांनी तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

महाराष्ट्राच्या 'शशी थरुर'ने तुकाराम मुंढेंबद्दल हे काय सांगितलं? असं बोलून गेले की... त्या शब्दांची तुफान चर्चा!
Vidyanand Bapat and Tukaram MundheImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 01, 2026 | 10:16 PM
Share

पुण्यातील गणेशोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. त्यांनी पुणेकरांना पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पुणे पोलिसांनीही डीजेच्या आवाजावर मर्यादा निश्चित केल्या आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज झाल्यास स्पीकर जप्त केले जातील, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. यावर महाराष्ट्राचे शशी थरुर म्हणून ओळखले जाणारे विद्यानंद बापट यांनी भाष्य केले आहे. बापट यांनी तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. बापट यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

विद्यानंद बापट यांनी नेमकं काय म्हटलं?

विद्यानंद बापट यांनी म्हटले की, ‘कायदे बनवताना त्यात पळवाटा कमी ठेवणे किंवा अजिबातच न ठेवणे गरजेचे आहे. आपण म्हणतो की लीगल लँग्वेज ही अचूक असते कारण त्यात पळवाटा खूप कमी असतात. कारण पळवाटा राहिल्या तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण होतो. पुण्यात डीजे बाबतच्या नियमात अनेक पळवाटा आहेत. यातील महत्त्वाची पळवाट अशी की, लाऊडस्पीकरच्या वापराला स्थानिक अधिकारी म्हणजे कलेक्टर किंवा पोलिस कमिशनर यांना अधिकार दिलेले आहेत. त्यांना स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत.

अप्रत्यक्षरित्या तुकाराम मुंढे यांचे कौतुक

पुढे बोलताना बापट यांनी म्हटलं की, ‘आता हे करता येऊ शकते की त्यांनी परिणाम लक्षात घेऊन परवानगी द्यायची. ते Shall इश्यू परवानगी नसून May इश्यू परवानगी आहे. Shall इश्यू म्हणजे तुम्ही फक्त फॉर्म भरला की तुम्हाला परवानगी मिळू शकते. पण May इश्यूमध्ये अधिकाऱ्यांना परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे. मात्र तसं होताना दिसत नाहीये. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी विरळच असतात. ज्यांच्यात इच्छा शक्ती असते. जिथे इच्छा तिथे मार्ग. अशी इच्छाशक्ती असणारे अधिकारी कमी असतात ना. आम्हाला असं वाटतं की जी पळवाट दिलेली आहे ती बंद करावी. सार्वजनिक ठिकाणी अशी परवानगी दिली जाऊ नये. म्हणजे वादाचा प्रश्नच उद्भवणार नाही.’

Follow Us
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो.....
Gokul Elections : गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, के.पी. पाटील असं का म्हणाले?
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
Rain Update : अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह ह्या जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?